पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

युक्रेनचे विमान चुकून पाडले; इराणी सैन्यांची कबुली

युक्रेन एअरलाइन विमान अपघात

युक्रेन विमान अपघातासंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. युक्रेनचे विमान चुकून पाडल्याची इराणी सैन्यांनी कबुली दिली आहे. बुधवारी तेहरान विमानतळाजवळ युक्रेनच्या विमानाला अपघात झाला होता. युक्रेनचे विमान अनावधानाने पाडले असल्याची इराणने कबुली दिली आहे. 

बस-ट्रकच्या अपघातानंतर भीषण आग; २० जणांचा मृत्यू

८ जानेवारी रोजी तेहरान विमानतळावरुन पहाटे ६.१२ च्या सुमारास युक्रेन एअर लाइनच्या विमाननं उड्डाण घेतले होते आणि अवघ्या  ६ मिनिटांत ते अपघातग्रस्त झाले. या विमान अपघातामध्ये १७६ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. यामध्ये ८२ इराणी, ६३ कॅनेडियन, ११ युक्रेनी, ४ अफगाणिस्तानी आणि ४ ब्रिटीश नागरिकांचा समावेश होता.

नागरिकत्व सुधारणा कायदा देशात लागू; केंद्राकडून अधिसूचना

ब्लॅक बॉक्स न मिळाल्यानं युक्रेन विमान अपघातामागचे नेमकं कारण समोर आले नव्हते. मात्र इराणकडून क्षेपणास्त्र डागताना मोठी चूक घडली असून त्यामुळेच विमानाचा अपघात झाल्याची शक्यता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्तवली होती. इराणनं विमान अपघात होण्याच्या काही वेळ आधीच दोन क्षेपणास्त्र डागली होती त्यानंतर स्फोटही झाला. अमेरिकन उपग्रहाद्वारे या हालचाली टिपल्या गेल्या आहेत, असे अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले होते.