पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

क्षेपणास्त्र डागताना इराणनं 'अपघाता'नं युक्रेनचं विमान पाडलं- अमेरिका

युक्रेन एअरलाइन विमान अपघात

दोन दिवसांपूर्वी झालेल्या युक्रेन  विमान अपघातात १७६ प्रवासी ठार झाले होते. या अपघाताचा ब्लॅक बॉक्स देण्यात इराणनं नकार दिला आहे. टेकऑफ झाल्यानंतर काहीवेळातच  हे विमान अपघातग्रस्त झालं, ब्लॅक बॉक्स न मिळाल्यानं अद्याप अपघातामागचं कारण कळलं नाही, मात्र इराणकडून क्षेपणास्त्र डागताना मोठी  चुक घडली असून त्यामुळेच प्रवासी विमानाचा अपघात झाल्याची शक्यता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्तवली असल्याचं अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितलं.

दुसऱ्याच्या घरी मुलगा झाला अन् हे पेढे वाटत फिरुन राहिले : फडणवीस

इराणनं विमान अपघात होण्याच्या काही वेळ आधीच दोन क्षेपणास्त्र डागली होती त्यानंतर स्फोटही झाला, अमेरिकन उपग्रहाद्वारे या हालचाली टिपल्या गेल्या आहेत, असं अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली. या दोन क्षेपणास्त्रांमुळेच अपघात झाला असल्याची अमेरिकेची शक्यता आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या घटनेवर संशय व्यक्त आहे, तिथे  असणाऱ्या कोणाकडून तरी नक्कीच चूक घडली असणार असं, ट्रम्प व्हाइट हाऊसमध्ये विमान अपघाताची माहिती देत असताना म्हणाले. 

मुलीच्या विनयभंग प्रकरणी DIG निशिकांत मोरे निलंबित

या अपघातात ८२ इराणी, ६३ कॅनेडियन, ११ युक्रेनी, ४ अफगाणिस्तानी, ४ ब्रिटीश नागरीक ठार झाले आहे. कॅनडानं देखील या हल्ल्याच्या चौकशीची  मागणी केली आहे. नेमकं काय घडलं याची खरी माहिती जाणून घेण्याचा आमचा अधिकार आहे, या अपघताविषयी कॅनडा आणि या देशाच्या नागरीकांमध्ये अनेक प्रश्नचिन्ह आहेत असं कॅनडाचे परराष्ट्र मंत्री म्हणाले. पहाटे ६.१२ च्या सुमारास युक्रेन एअर लाइनच्या विमाननं उड्डाण घेतलं आणि अवघ्या  ६ मिनिटांत ते अपघातग्रस्त झालं. याच दरम्यान इराणनं इराकमधील अमेरिकन लष्करी तळावर क्षेपणास्त्रांचा मारा केला होता, त्यामुळे या अपघातवर अनेक प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.