पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हिंसक आंदोलनानंतर धगधगत्या दिल्लीची जबाबदारी या अधिकाऱ्याकडे

दिल्लीतील आंदोलन हिंसक मार्गावर

दिल्लीतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. सीआरपीएफचे महासंचालक आणि आयपीएस अधिकारी एसएन श्रीवास्तव यांची दिल्ली पोलिस विशेष आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. मागील तीन दिवसांपासून दिल्लीतील आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. आंदोलनातील हिंसाचारामध्ये एका पोलिस कर्मचाऱ्यासह आतापर्यंत १३ जणांनी आपले प्राण गमावले आहेत. हिंसाचाराच्या घटनेत १३० हून अधिक लोक जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  

दिल्ली हिंसाचार: आतापर्यंत १३ जणांनी गमावला जीव

सुधारित नागरिकत्व काद्याच्या मुद्यावरुन इशान्य दिल्लीमध्ये मंगळवारी सलग तिसऱ्या दिवशी आंदोलनात हिंसक घटना घडल्या. मौजपूर, भजनपूरा आणि ब्रह्मापूरी जमावाने दगडफेक केल्याची घटना घडली. यात १ पोलिस कर्माचाऱ्यासह १३ जणांचा मृत्यू झाला आहे. मौजपूरमध्ये मोठ्या प्रमाणात जाळपोळीच्या घटना घडली. त्यानंतर  चांद बाग परिसरातही जाळपोळ झाल्याचे वृत्त समोर येत आहे. 

दिल्लीला वाचवायचं असेल तर लष्कराकडे सोपवाः ओवेसी

दिल्लीचे पोलिस आयुक्त अमूल्य पटनायक यांनी दंगेखोरांची सोडणार नाही, अशा शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, हिंसाचाराला चालना देणाऱ्याविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल. ज्या भागातील आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे त्या भागातील अनेक परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली असून पोलिसातील उच्च अधिकारी घटनास्थळी उपस्थितीत आहेत. दिल्लीतील वेगवेगळ्या ठिकाणी सुरु असलेल्या हिंसक आंदोलनाच्या घटनेनंतर नोएडामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आले आहे.  
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:IPS SN Shrivastava has been appointed as Special Commissioner Law and Order in Delhi Police