पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वीरप्पनचा खात्मा करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याची गृह मंत्रालयात सल्लागार म्हणून नियुक्ती

के विजय कुमार

२००४ मध्ये वीरप्पनला मारण्यात प्रमुख भूमिका बजावणारे भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) अधिकारी के. विजय कुमार यांना केंद्रीय गृह मंत्रालयात वरिष्ठ सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. सरकारी आदेशात म्हटले आहे की के विजय कुमार हे जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशासंदर्भात आणि नक्षलवाद प्रभावित राज्यातील सुरक्षेसंदर्भात केंद्रीय गृह मंत्रालयाला सल्ला देतील.

पॉक्सो कायद्यातील आरोपीला दया याचिकेची मुभाच नसावी: राष्ट्रपती

३ डिसेंबर रोजी विजय कुमार यांच्या नियुक्ती संदर्भातील आदेश जारी करण्यात आला आहे. एक वर्षासाठी ते या पदावर कार्यरत असतील, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. विजय कुमार यांनी केंद्रीय राखीव पोलिस दलामध्ये महासंचालक म्हणून काम बघितले आहे. हैदराबाद येथील राष्ट्रीय पोलिस अकादमीचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. २००४ मध्ये त्यांच्या नेतृत्त्वाखालील तामिळनाडू पोलिसांच्या विशेष पथकाने वीरप्पनची हत्या केली होती. 

'जिथे मनोरंजन असते तिथे कोणत्या ना कोणत्या स्वरुपाचा वाद असतोच'