पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

किंग्ज इलेव्हनचा नवा फंडा, या लीगमधील संघावर लावला डाव

किंग्ज इलेव्हन पंजाब

किंग्ज इलेव्हन पंजाब कॅरेबियन प्रीमियर लीग (सीपीएल) मधील सेंट लूसिया फ्रेंजाइजी खरेदी करण्याच्या तयारीत आहे. जर त्यांची ही डील पक्की झाली तर कोलकाता नाईट रायडर्सनंतर सीपीएल संघ खरेदी करणारा किंग्ज इलेव्हन पंजाब हा आयपीएलमधील दुसरा संघ  ठरेल. 

एबीच्या कमबॅकचा संभ्रम कायम, ड्युप्लेसीस-रबाडाला संधी

किंग्ज इलेव्हन पंजाबचे सह मालक नेस वाडिया यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, आम्ही सीपीएलचा हिस्सा बनण्यासाठी उत्सुक आहोत. लवकरच आम्ही या नव्या करारावर हस्ताक्षर करणार आहे. बीसीसीआयकडून परवानगी मिळाल्यानंतर संघाचे नाव आणि इतर गोष्टी स्पष्ट करु, असेही त्यांनी म्हटले आहे. नेस वाडिया पुढे म्हणाले की, 'मोहित बर्मन ( किंग्ज इलेव्हन पंजाब सह मालक) करारावर स्वाक्षरी करण्यासाठी सध्या कॅरेबियन संघाच्या संपर्कात आहेत. यासंदर्भात आम्ही गेल्या नऊ महिन्यांपासून प्रयत्नशील होतो. यासंदर्भातील प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहचली आहे. सहकार्याबद्दल  सेंट लूसियाच्या पंतप्रधान एलेन चेस्टनेट यांचे आभार मानतो, असेही ते म्हणाले.  

फाफ ड्युप्लेसीनं दक्षिण आफ्रिकन संघाचे नेतृत्व सोडले

सेंट लूसिया जोक्स सीपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या सहा संघापैकी एक आहे. या संघाचे नेतृत्व  वेस्टइंडीजचा माजी कर्णधार  डेरेन सॅमी याच्याकडे आहे. इंडियन प्रीमियर लीगमधील कोलकाता नाईट रायडर्सने २०१५ मध्ये ट्रिनबागो नाइट राइडर्सशी करार केला होता. सीपीएलमधील हा सर्वात यशस्वी संघ असून त्यांनी तीनवेळा विजेतेपद पटकावले आहे. सेंट लूसियाने २०१६ मध्ये सर्वोत्तम कामगिरी केली होती. ते चौथ्या क्रमांकावर राहीले होते.