पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चिदंबरम यांना झटका, दिल्ली हायकोर्टच्या आदेशाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

पी चिदंबरम

आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांना झटका देत सुनावणीस नकार दिला आहे. कायद्याअंतर्गत यावर उपाय शोधण्याची सूट आहे, असे मत न्यायालयाने याचिका फेटाळताना नोंदवले. अंतरिम जामीन याचिका फेटाळण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधातील चिदंबरम यांच्या याचिकेला कोणताच अर्थ नाही. कारण ते आधीपासूनच सीबीआयच्या अटकेत आहेत. दुसरीकडे चिदंबरम यांच्या ईडी प्रकरणाची सर्वोच्च न्यायलयात सुनावणी सुरु आहे. चिदंबरम यांची ५ दिवसांची कोठडी आज संपत आहे.

न्या. भानुमती यांच्या पीठाने म्हटले की, अटकेनंतर याचिकेवर सुनावणी होऊ शकत नाही. हा सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्वीचा निर्णय आहे. जर चिदंबरम यांना सीबीआय प्रकरणात दिलासा हवा असेल तर त्यांना खालच्या न्यायालयात जावे लागेल. 

भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या २२ वरिष्ठ अधिकाऱ्यांना 'नारळ'

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, नियमित जामिनासाठी तुम्हाला योग्य न्यायालयात जावे लागेल. सीबीआय रिमांडची याचिका आता अर्थहीन झाली आहे. दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयाकडून आयएनएक्स मीडिया खटल्याप्रकरणात अंतरिम जामिनाचा अर्ज फेटाळल्यानंतर २१ ऑगस्टला सीबीआयने चिदंबरम यांना अटक केली होती.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:INX media SC dismisses appeal filed by P Chidambaram against the Delhi HC order which dismissed his anticipatory bail plea