पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चिदंबरम यांच्या आत्मसमर्पण अर्जावरील निकाल कोर्टाने ठेवला राखून

पी. चिदंबरम

आयएनएक्स मीडिया प्रकरणावर आज सुनावणी झाली. यावेळी दिल्लीतील एका न्यायालयाने माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्या आत्मसमर्पण अर्जावरील निर्णय शुक्रवारपर्यंत राखून ठेवला आहे. न्यायालयाने दोन्ही पक्षाच्या वकिलांना आपल्या बाजू मांडायला सांगितल्या. तर चिदंबरम यांचे वकील कपिल सिब्बल यांनी सांगितले की, 'पी. चिदंबरम जेव्हा वाटेल तेव्हा आत्मसमर्पण करु शकतात. तो त्यांचा अधिकार आहे.' तसंच त्यांनी न्यायालयासमोर सांगितले की, ईडीची विनंती दुर्भावनापूर्ण आहे. चिदंबरम यांचा छळ करण्याचा त्यांचा हेतू आहे, असा आरोप सिब्बल यांनी केला आहे.  

दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला: शस्त्र साठ्यासह तिघांना अटक

दरम्यान, आयएनएक्स मीडिया भ्रष्टाचारप्रकरणी तिहार तुरुंगात असलेल्या माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांच्या जामीन याचिकेवर आज सुनावणी झाली. यावेळी दिल्ली उच्च न्यायालयाने  सीबीआयकडे स्पष्टीकरण मागितले आहे. न्यायमूर्ती सुरेश कैत यांनी  चिदंबरम यांच्या जामीन याचिकेवर सीबीआयकडे स्पष्टीकरण मागितले आहे. याचिकेमध्ये काँग्रेस नेत्याने दावा केला आहे की, हे प्रकरण राजकीय सुडाचे आहे. 

पुढच्या वर्षी लवकरच येणार बाप्पा!

दिल्लीतील एका न्यायालयाने चिदंबरम यांना १९ सप्टेंबरपर्यंत नायालयीन कोठडी सुनावली आहे. या निर्णयाविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र त्यांनी ही याचिका मागे घेतली आहे. त्यामुळे न्यायालयाने याप्रकरणाची पुढची सुनावणी २३ सप्टेंबरला होणार असल्याचे सांगितले. त्यामुळे चिदंबरम यांना आणखी काही दिवस तिहार तुरुंगात काढावे लागणार आहे. 

'पद्म' पुरस्कारांसाठी या महिला खेळाडूंच्या नावांची शिफारस

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:inx media money laundering case court reserves order on chidambaram surrender plea for friday