पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पी. चिदंबरम यांच्या कोठडीत २४ ऑक्टोबरपर्यंत वाढ

पी. चिदंबरम

आयएनएक्स मीडिया प्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सीबीआय प्रकरणी चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत २४ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. तसंच २४ ऑक्टोबरपर्यंत त्यांना ईडीच्या ताब्यात पाठवण्यात आले आहे. ईडीने याप्रकरणाच्या  चौकशीसाठी चिदंबरम यांची १५ दिवसांची कोठडी मिळावी अशी मागणी कोर्टाकडे केली होती. चिदंबरम यांना ईडी कोठडीत घरचे जेवण, औषधे, वेस्टर्न टॉयलेट देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

पुणे देशाला संस्कारही देते आणि स्टार्टअपही : PM मोदी

बुधवारी ईडीने पी. चिदंबरम यांना मनी लाँड्रिंगच्या विविध कलमांतर्गत अटक केली. तर यापूर्वीच सीबीआयने त्यांना याप्रकरणी अटक केली होती. ते तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडीत होते. आजच्या सुनावणी दरम्यान कोर्टाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली आहे. त्यामुळे चिदंबरम यांना २४ ऑक्टोबरपर्यंत तिहार कारागृहामध्येच मुक्काम करावा लागणार आहे.

'शिवाजी महाराजांचे संस्कार आमच्यासोबत होते आता परिवारही आहे'

दरम्यान, कोर्टाने पी. चिदंबरम यांना तुरुंगात असताना वेस्टर्न टॉयलेट, घरचे जेवण, औषध देण्याची मागणी मान्य केली. त्याबरोबरच चिदंबरम यांना स्वतंत्र कक्षात ठेवण्याच्या मागणीसही कोर्टाने मान्यता दिली. ईडीच्या ताब्यात असताना चिदंबरम यांना वेगळ्या कक्षात ठेवावे, असे कोर्टाने यावेळी सांगितले.

बांगलादेशच्या सैनिकांनी केलेल्या गोळीबारात बीएसएफचा जवान शहीद

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:inx media enforcement directorate custody of Congress leader P Chidambaram has been extended till 24th October