पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चिदंबरम यांना धक्का, अटकपूर्व जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळला

पी चिदंबरम

आयएनएक्स मीडिया प्रकरणात माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळला. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय़ म्हणजे चिदंबरम यांना मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. या प्रकरणी चिदंबरम यांची कोठडीत चौकशी करणे गरजेचे असल्याचा सक्तवसुली संचालनालयाच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला आहे.

ऑक्टोबरपासून कर्जे आणखी स्वस्त, रिझर्व्ह बँकांचा महत्त्वपूर्ण निर्णय

आपल्याला अटकेपासून संरक्षण मिळावे, यासाठी चिदंबरम यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावरील युक्तिवादानंतर न्यायालयाने गुरुवारी आपला निकाल दिला. या प्रकरणात करण्यात आलेले आरोप गंभीर आणि वेगळ्या स्वरुपाचे आहेत. त्यामुळे त्याकडे वेगळ्या पद्धतीने पाहिले गेले पाहिजे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. 

नालासोपाऱ्यात वाहून गेलेल्या चिमुकल्याचा मृतदेह सापडला

चिदंबरम यांना अटकपूर्व जामीन मंजूर केल्यास त्याचा या प्रकरणाचा तपासावर परिणाम होईल. त्यामुळेच चिदंबरम यांच्या अर्जाचा विचार करता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. या प्रकरणाची सुनावणी सुरू असलेल्या न्यायालयात चिदंबरम जामीनासाठी स्वतंत्रपणे अर्ज करू शकतात, असेही न्यायालयाने आपला निकाल देताना स्पष्ट केले. दिल्ली उच्च न्यायालयाने चिदंबरम यांच्या अटकेला दिलेले संरक्षण हटविल्यानंतर २१ ऑगस्ट रोजी रात्री चिदंबरम यांना दिल्लीत अटक करण्यात आली होती.