पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काहीही झालं तरी आम्ही चिदंबरम यांच्या पाठीशीः प्रियांका गांधी

प्रियंका गांधी

आयएनएक्स मीडिया प्रकरणात माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळला. दरम्यान, काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वाड्रा या पी. चिदंबरम यांच्या समर्थनार्थ पुढे आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर प्रियंका गांधी यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. चिदंबरम यांनी आतापर्यंत स्पष्टपणे सत्य सांगितले. तसंच त्यांनी सरकारच्या अपयशाचा पर्दाफाश केल्यामुळे सरकार त्यांच्या मागे लागली आहे. मात्र, पी. चिदंबरम यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. सत्यासाठी आमचा लढा सुरुच राहणार असल्याचे प्रियंका गांधी यांनी सांगितले.

INX मीडिया घोटाळाः सुप्रीम कोर्टाकडूनही चिदंबरम यांना दिलासा नाही

प्रियंका गांधी यांनी ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, 'राज्यसभेचे सन्माननीय सदस्य पी. चिदंबरम यांनी वित्तमंत्री, गृहमंत्री आणि इतर पदांवर दशकांपासून संपूर्ण निष्ठेने देशाची सेवा केली. प्रियंका गांधींनी दावा केला की, 'ते नेहमी सत्य बोलतात तसंच त्यांनी आतापर्यंत सरकारच्या अपयशाचा खुलासा केला आहे. त्यामुळे सरकार त्यांच्या मागे लागली आहे. पुढे प्रियंका गांधीनी सांगितले की, आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत आणि सत्यासाठी लढत राहणार आहोत. त्याचा परिणाम काय होईल याची आम्हाला पर्वा नाही, असे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे.

ठाण्यामध्ये मनसे कार्यकर्त्याची आत्महत्या

आयएनएक्स मीडिया प्रकरणात माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे पी. चिदंबरम यांना अटक होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. अशामध्ये कालपासून दोनवेळा सीबीआय आणि ईडीची टीम त्यांच्या घरी दाखल झाल्या मात्र चिदंबरम घरी उपस्थित नाहीत. दरम्यान, पी. चिदंबरम यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने देखील त्यांच्या जामीन अर्जावर तात्काळ सुनावणी करण्यास नकार दिला. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना बुधवारी येण्यास सांगितले आहे. 

कलम ३७० हटवल्यानंतर पहिलीच चकमक;१ जवान शहीद