पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चिदंबरम यांना अटक ही तर आनंदाची बातमी - इंद्राणी मुखर्जी

पी चिंदबरम

आयएनएक्स मीडिया प्रकरणात माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांना झालेली अटक म्हणजे आनंदाची बातमी असल्याची प्रतिक्रिया या प्रकरणातील माफीच्या साक्षीदार इंद्राणी मुखर्जी यांनी व्यक्त केली आहे. एएनआयने या संदर्भातील ट्विट केले आहे. या प्रकरणात चिदंबरम यांना २१ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती.

पाकिस्तानकडून अण्वस्त्र सज्ज गझनवी क्षेपणास्त्राची चाचणी

चिदंबरम यांनी आपल्या अटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर गुरुवारी सुनावणी सुरू झाली. दिल्ली उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याविरोधात चिदंबरम यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. चिदंबरम यांच्या बाजूने कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी बाजू मांडत आहेत. त्यांनी युक्तिवाद करताना सांगितले की चिदंबरम यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाकडे कोणताही ठोस आणि खरा पुरावा उपलब्ध नाही.

सोलापूरमध्ये वडवळ पुलावरुन ट्रक कोसळला; रेल्वेसेवा विस्कळीत

सक्तवसुली संचालनालयाच्या वतीने बाजू मांडताना महाधिवक्ता तुषार मेहता यांनी वादी पक्षाचा युक्तिवाद फेटाळला. चिदंबरम यांची परदेशात संपत्ती असल्याची नेमकी माहिती सक्तवसुली संचालनालयाला मिळाली असल्याचे त्यांनी न्यायालयात सांगितले. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:INX Media Case Indrani Mukherjea who turned approver in case says P Chidambarams arrest good news