पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

INX मीडिया प्रकरण: सीबीआयनंतर ईडीचे पथक चिदंबरम यांच्या घरी दाखल

ईडीची टीम चिदंबरम यांच्या घरी दाखल

आयएनएक्स मीडिया प्रकरणात माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळला. त्यामुळे पी. चिदंबरम यांना अटक होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर मंगळवारी सायंकाळी सीबीआयची टीम त्यांच्या घरी दाखल झाली. मात्र पी. चिदंबरम घरी उपस्थित नसल्यामुळे सीबीआयची टीम निघून गेली. त्यानंतर आता ईडीची टीम देखील त्यांच्या घरी दाखल झाली आहे.

चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला

आयएनएक्स मीडिया प्रकरणामध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने पी. चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर पी. चिदंबरम यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने देखील त्यांच्या जामीन अर्जावर तात्काळ सुनावणी करण्यास नकार दिला. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना बुधवारी येण्यास सांगितले आहे. केंद्रीय अन्वेषण विभाग आणि सक्तवसुली संचालनालयाकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

गुलाम नबी आझाद यांना पुन्हा रोखले; जम्मूवरुन दिल्लीला परत पाठवले

दरम्यान, या प्रकरणात पी. चिदंबरम यांच्याकडून सादर करण्यात आलेले दोन्ही अर्ज नाकारण्यात येत आहेत, असे न्या. सुनील गौर यांनी स्पष्ट केले. २५ जानेवारी रोजी न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला होता. तात्काळ अटक करण्यात येऊ नये, म्हणून तीन दिवसांचे अटकेपासून अंतरिम संरक्षण देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी चिदंबरम यांच्याकडून करण्यात आली होती. ती सुद्धा न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे चिदंबरम यांना धक्का बसला आहे. 

बंदुकीचे लॉक काढताना गोळी सुटली; चौघे जखमी