पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पी. चिदंबरम यांच्या ईडीच्या अटकेसंदर्भातील निकाल ५ सप्टेंबरला

सर्वोच्च न्यायालय

आयएनएक्स मीडिया प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयात असलेल्या ईडी प्रकरणात पी. चिदंबरम यांना दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने चिदंबरम यांच्या ईडीच्या अटकेत वाढ केली असून या प्रकरणाचा अंतिम निकाल ५ सप्टेंबरला देण्यात येणार आहे.  

चिदंबरम यांना अटक ही तर आनंदाची बातमी - इंद्राणी मुखर्जी

यापूर्वी बुधवारी झालेल्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने ईडी प्रकरणातील अटकेसंदर्भात चिदंबरम यांना एक दिवसाची सूट दिली होती. आयएनएक्स मीडिया प्रकरणातील गैरव्यवहाराच्या आरोपाखाली सध्या चिदंबरम केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) ताब्यात आहेत. सीबीआयने मागील आठवड्यात त्यांना अटक केली होती. 

INX Media Case: ईडीच्या अटकेपासून चिदंबरम यांना आणखी एक दिवस दिलासा

माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांच्यावर ईडी प्रकरणात देखील अटकेची टांगती तलवार आहे. पी. चिदंबरम यांनी  दिल्ली उच्च न्यायालयाने २० ऑगस्टला दिलेल्या आदेशाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालाय धाव घेतली होती.