पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चिदंबरम यांची तिहारमध्ये रवानगी, ७ क्रमांकाच्या कारागृहात मुक्काम

पी चिदंबरम (Photo: PTI)

आयएनएक्स मीडिया प्रकरणात दिल्लीच्या एका न्यायालयाने (सीबीआय न्यायालय) माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांना १९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे चिदंबरम यांना तिहार कारागृहात पाठवण्यात आले आहे. चिदंबरम यांना देण्यात येणारी झेड सुरक्षा लक्षात घेत न्यायालयाने त्यांना वेगळ्या कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. चिदंबरम यांना कारागृहात योग्य ती सुरक्षा देण्यात येईल, असे आश्वासन सॉ़लिसिटर जनरल तुषार मेहता यांनी आश्वासन न्यायालयाला दिले. चिदंबरम यांना सात क्रमांकाच्या कारागृहात ठेवले जाईल. चिदंबरम यांची दोन दिवसांची सीबीआय कोठडी संपल्यानंतर आयएनएक्स मीडिया प्रकरणात गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत त्यांची रवानगी केली. न्यायालयाने त्यांना आपली औषधे कारागृहात घेऊन जाण्यास परवानगी दिली आहे.

चिदंबरम यांना विशेष न्यायालयात आणले. त्यानंतर काही वेळातच त्यांच्याविरोधात जारी करण्यात आलेल्या अजामीनपात्र वॉरंटला आव्हान देणारी याचिका मागे घेतली होती. अजामीनपात्र वॉरंट जारी केल्यानंतर चिदंबरम यांना सीबीआयच्या कोठडीत पाठवण्यात आले होते.

तिहारच्या ७ क्रमांकाच्या कारागृहात साधारणपणे आर्थिक गुन्ह्याशी निगडीत आरोपींना ठेवले जाते. त्यांना खाण्यास डाळ, भाजी आणि रोटी दिली जाईल. त्याचबरोबर त्यांनी पाश्चात्य पद्धतीच्या स्वच्छतागृहाची मागणी केली होती. न्यायालयाने त्यांची ही मागणी मान्य केली.