पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

स्वयंघोषित गुरु नित्यानंद विरोधात इंटरपोलकडून नोटीस जारी

नित्यानंद

गेल्यावर्षी पासपोर्टशिवाय भारतातून पळून गेलेला स्वयंघोषित गुरु नित्यानंद विरोधात इंटरपोलने ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली. नित्यानंद विरोधात कर्नाटकमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुजरात पोलिसांनी या प्रकरणी केलेल्या विनंतीनंतर इंटरपोलने नोटीस जारी केली. 

'...हा भाजप आणि संघ परिवाराच्या बदनामीचा कट'

कोणत्याही देशातील कायद्याचे उल्लंघन करून किंवा गुन्हा दाखल झाल्यानंतर पळून गेलेल्यांविरोधात इंटरपोलकडून ही नोटीस जारी केली जाते. संबंधित व्यक्तीचा शोध घेण्यासाठी ब्लू नोटीस बजावली जाते. नित्यानंद भारतातून पळून इक्वेडोरमध्ये गेल्याच्या वृत्ताचे भारतातील त्यांच्या दूतावासाने खंडन केले होते. दक्षिण अमेरिकेमध्ये नित्यानंदला इक्वेडोरनेच आश्रय दिल्याच्या वृत्ताचेही त्यांनी खंडन केले होते. इक्वेडोरजवळ असलेल्या एका छोट्या बेटावर नित्यानंदने स्वतःचाच नवा देश निर्माण केल्याचीही चर्चा गेल्यावर्षी रंगली होती.

भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने या सर्व चर्चा फेटाळून लावल्या होत्या. त्याचवेळी नित्यानंद ज्या देशांमध्ये आश्रय घ्यायला जाण्याची शक्यता असल्याचे वाटते आहे तेथील सरकारशी संपर्क साधण्यात आला असून, नित्यानंद विरोधात असलेल्या गुन्ह्यांची माहिती त्यांना देण्यात आली आहे.

मुंबईतील 'नाईट लाईफ'ला मंत्रिमंडळाची मंजुरी, अशी होणार अंमलबजावणी

स्वतःचा आश्रम चालविण्यासाठी धनिकांकडून देणगी आणण्यासाठी नित्यानंदने काही मुलांना बंधक बनवले होते. यावरून गुजरातमध्ये त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुजरात पोलिस त्याच्या शोधात आहेत.