पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटींचा चुना लावून परदेशात फरार झालेल्या नीरव मोदीच्या भावाविरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. इंटरपोलने नेहाल मोदीविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, पीएनबी घोटाळा प्रकरणातील आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहाल मोदीविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे. ४० वर्षीय बेल्जियम नागरिक असलेल्या निहालविरोधात जागतिक अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास ईडी करत आहे.
Interpol has issued notice against Nirav Modi’s brother Nehal Deepak Modi in a money laundering case. pic.twitter.com/cUy3nEynxL
— ANI (@ANI) September 13, 2019
सलग ४ दिवस बँक राहणार बंद; महत्वाची कामं आताच करा
आरसीएनने दिलेल्या माहितीनुसार, नेहाल मोदीचा जन्म बेल्जियमच्या एंटवर्प येथे झाला आणि त्यांला इंग्रजी, गुजराती आणि हिंदी भाषा समजते. पीएनबी घोटाळा प्रकरणात ईडीने दाखल केलेल्या आरोप पत्रामध्ये त्याचे नाव आहे. नेहाल मोदीवर महत्वाचे पुरावे नष्ट केल्याचा आरोप लावण्यात आला आहे.
एआयएडीएमके पक्षाचे होर्डिंग अंगावर पडून तरुणीचा मृत्यू
नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी पीएनबी घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. मागच्या वर्षी हे प्रकरण समोर आले. या दोघांनी पंजाब नॅशनल बँकेला तब्बल १४ हजार कोटी रुपयांचा चूना लावला आहे. दरम्यान, पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील सूत्रधार नीरव मोदी याच्या कोठडीत १९ सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. नीरव मोदी सध्या ब्रिटनच्या तुरुंगात आहे.