पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

International Yoga Day 2019 : योगदिन २१ जूनला का साजरा केला जातो?

आंतरराष्ट्रीय योग दिवस

भारतात योगासनांची परंपरा ५००० वर्षे जुनी आहे. योगविद्या म्हणजे शरीर आणि आत्मा यांच्यातील सामंजस्याचे अदभूत विज्ञान मानले जाते. या प्राचीन विद्येबद्दल नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. २०१५ मध्ये याची सुरुवात झाली होती. योगासने सुरू करण्याला कोणत्याही एका दिवसाची गरज नाही. पण २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून का साजरा केला जातो, त्याची कारणे जाणून घेणे गरजेचे आहे.

उत्तर गोलार्धात २१ जून हा सर्वांत मोठा दिवस असतो. म्हणजेच या दिवशी सूर्य खूप लवकर उगवतो आणि उशीरा मावळतो. त्यामुळेच या दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघातील भाषणामध्ये सुचविले होते.

 

International Yoga Day LIVE: योगासने जीवनशैलीचा अविभाज्य भाग व्हावा - मोदी

११ डिसेंबर २०१४ मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेने २१ जून हा दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले. २०१५ पासून आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभरात साजरा केला जाऊ लागला. 

योग दिवसाची थीम काय होती?
२०१५: सदभाव आणि शांतीसाठी योग Yoga for Harmony and Peace
२०१६: युवकांना जोडण्यासाठी योग Connect the youth
२०१७: निरोगी आरोग्यासाठी योग Yoga for Health
२०१८: शांततेसाठी योग Yoga for Peace
२०१९: पर्यावरणासाठी योग Yoga for Climate Action