पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

VIDEO : लडाखमध्ये उणे २० तापमानात जवानांकडून योगासने

योगासने

जगभरात शुक्रवारी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो आहे. प्रत्येकजण आपापल्यापरीने योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी झाला आहे. योगदिनानिमित्त राजकीय पक्षांच्या नेत्यांपासून ते जवानांपर्यंत सर्वांनीच योगासने केली. इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिस अर्थात आयटीबीपीच्या जवानांनी शुक्रवारी लडाखमध्ये उणे २० तापमानामध्येही योगासने केली.

International Yoga Day : योगदिन २१ जूनला का साजरा केला जातो?

जम्मूमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनीही आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगासने केली. आयटीबीपीच्या जवानांनी लेहमध्येही योगासने केली. छत्तीसगढमधील नक्षल प्रभावित भागातही या जवानांनी योगासने करून आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा केला.

आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रांचीमध्ये ४० हजार लोकांसमवेत योग केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हरियाणातील रोहतकमध्ये योगदिनाच्या कार्यक्रमात सहभागी होऊन योगासने केली. योगासने आपल्या संस्कृतीचा हिस्सा आहेत. योगासनांच्या प्रचारासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:international yoga day 2019 itbp personnel perform yoga at northern ladakh in minus 20 degrees celsius temperature