पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेसंदर्भात आज आंतरराष्ट्रीय न्यायालयात निकाल

कुलभूषण जाधव

पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेच्या प्रकरणात हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालय (आयसीजे) आज (बुधवारी) निकाल देणार आहे. 

पाकच्या लष्करी न्यायालयाने हेरगिरीच्या आरोपांर्तगत कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. कुलभूषण यांच्या शिक्षेच्या विरोधात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. या प्रकरणाच्या मागील सुनावणी वेळी (मे २०१७) आयसीजेने जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा आहेत.  

करतारपूर कॉरिडॉर: दररोज ५ हजार भाविकांना विना व्हिसा प्रवेश मिळणार

आयजीसीने या महिन्याच्या सुरुवातीला दिलेल्या माहितीनुसार, हेग येथील पीस पॅलेसमध्ये १७ जुलै रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार, साडेसहा वाजता या प्रकरणातील सार्वजनिक सुनावणी करण्यात येईल. मुख्य न्यायाधीश अब्दुलकावी अहमद यूसुफ निकाल देतील.