पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अंतर्गत राजकारणामुळे आम्हाला शपथविधीचे निमंत्रण नाही, पाकचे पररराष्ट्र मंत्री

इम्रान खान आणि नरेंद्र मोदी

भारतातील अंतर्गत राजकारणामुळे नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना निमंत्रित करण्यात आले नाही, असे म्हणत पाकिस्तानने आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे. येत्या ३० मे रोजी नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यासाठी विविध राष्ट्रप्रमुखांना बोलावण्यात आले आहे. पण भारताने पाकिस्तानला निमंत्रित केलेले नाही. 

शपथविधी सोहळ्यासाठी बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, भूतान आणि नेपाळ या सहा देशांच्या प्रमुखांना निमंत्रित करण्यात आले आहे. हे सर्व बिमस्टेकचे (Bay of Bengal Initiative for Multi-Sectoral Technical and Economic Cooperation) सदस्य देश आहेत. पाकिस्तान या गटातील सदस्य नाही. त्यामुळे पाकिस्तानला निमंत्रित करण्यात आलेले नाही. 

नरेंद्र मोदींच्या शपथविधीला BIMSTEC राष्ट्रांचे नेतेही उपस्थित राहणार

भारताने शपथविधी सोहळ्याला निमंत्रित न केल्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना तेथील परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी म्हणाले, शपथविधी सोहळ्याला जाण्यापेक्षा उभय देशांमधील विविध प्रश्न सोडविण्यासाठी बैठक घेतल्यास त्यासाठी जायला आम्हाला आवडेल. पाकिस्तानला आपण कसा धडा शिकवला, यावरच त्यांनी (नरेंद्र मोदी) प्रचार केला. त्यामुळे लगेचच ते यापासून मागे फिरून पाकिस्तानला निमंत्रित करणे शक्यच नाही, असे त्यांनी 'डॉन' या पाकिस्तानातील वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

भारतातील अंतर्गत राजकारणामुळेच पाकिस्तानला निमंत्रित करण्यात आलेले नाही, असेही त्यांनी सांगितले.