पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बहावलपूर येथील बॉम्ब प्रूफ घरात लपून बसला आहे 'बेपत्ता' मसूद अजहर

मसूद अझहर. (AP Photo)

पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या आणि भारतासाठी मोस्ट वाँटेड दहशतवादी मौलाना मसूद अजहर बेपत्ता असल्याचे वृत्त आले होते. परंतु, भारताच्या दहशतवाद विरोधी यंत्रणांनी मसूद अजहर कडक सुरक्षा व्यवस्थेत एका बॉम्ब प्रूफ घरात सुरक्षित असल्याचे म्हटले आहे. मसूद अजहर पाकिस्तानमधील रेल्वे लिंक रोड, मरकज-ए-उस्मान-ओ-अली येथील दहशतवादी समूहाच्या बहावलपूर हेडक्वार्टरच्या मागे एका व्हर्च्यअल बॉम्ब प्रूफ घरात राहत आहे. नाव न जाहीर करण्याच्या अटीवर एका गुप्तचर अधिकाऱ्याने ही माहिती दिली. 

'त्या' जहाजमधील आणखी दोन भारतीयांना कोरोनाचा विळखा

बहावलपूरमध्ये कौसर कॉलनी, खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बन्नू येथे मदरसा बिलाल हब्शी आणि त्याच प्रांतातील लक्की मरवतमध्ये मदरसा मस्जिद-ए-लुकमान हे मसूद अजहरचे इतर तीन पत्ते आहेत. गेल्या फेब्रुवारीत पुलवामा हल्ल्यानंतर भारताकडून सोपवण्यात आलेल्या डॉजियरनुसार, २०१६ मध्ये पठाणकोट एअरबेसवर जैशच्या दहशतवादी हल्ल्यानंतर मिळालेल्या मोबाइल नंबरपैकी एक मोबाइल नंबर थेट बहादूरपूर दहशतवादी शिबिराशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले होते. 

महात्मा गांधी स्वत:ला कट्टर सनातनी हिंदू मानायचे : मोहन भागवत

नुकताच हाती आलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तान पॅरिस येथे रविवारपासून सुरु होत असलेल्या फायनान्शियल एक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ) बैठकीत मसूद अजहर गायब असल्याचे सांगू शकते. पाकिस्तानने एफएटीएफच्या प्लॅनरी बैठकीपूर्वी दहशतवादी फंडिंगच्या आरोपाखाली जमात-उद-दावाचा प्रमुख दहशतवादी हाफिज सईद आणि त्याच्या सहकाऱ्यांना दोन प्रकरणात सुमारे साडेपाच-पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. परंतु, मुंबई २००८ हल्ल्यातील मास्टरमाईंड दहशतवादी मसूद अजहर आणि रहमान लख्वीविरोधात योग्य ती कारवाई केली नाही. यावरुन पाकिस्तानवर मोठ्या प्रमाणात टीकाही करण्यात आली.

ब्रिटनच्या महिला खासदाराचा भारत सरकारवर आरोप

मसूद अजहर बेपत्ता असल्याचे सांगून भारत आणि संपूर्ण जगाची दिशाभूल करण्याचा पाकचा डाव आहे. त्यामुळे पाकला एफएटीएफच्या काळ्या यादीत जाण्याचा धोका संपुष्टात येईल आणि चीनच्या मदतीने ते ग्रे यादीतूनही बाहेर येतील. एफएटीएफचे अध्यक्षपद सध्या चीनकडे आहे.

पाकच्या दहशतवादी विरोधी न्यायालयाने मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदला ११ वर्षांची शिक्षा सुनावली होती. तज्ज्ञांकडून मिळालेल्या माहितीनुसार एफएटीएफच्या बैठकीनंतर पाकिस्तान पुन्हा एकदा कुटील डाव टाकत हाफिज सईदला मुक्त करेल.

नवे डेथ वॉरंट; निर्भयाच्या दोषींना ३ मार्चला सकाळी ६ वाजता फाशी