पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आरएसएसची कार्यालये, पदाधिकारी दहशतवाद्यांच्या रडारवर, सुरक्षेत वाढ

आरएसएसच्या कार्यालयांवर दहशवादी हल्ल्याची शक्यता, सुरक्षेत वाढ (संग्रहित छायाचित्र)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) नेते आणि त्यांचे कार्यालय दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याचा अहवाल गुप्तचर संस्थांनी दिला आहे. जागतिक दहशतवादी संघटना हल्ल्यासाठी आयईडी किंवा आयईडी (व्हीबीआयईडी) चा वापर करु शकतात. 

'आरोपीला कठोर शिक्षा देऊ, नागरिकांनी संयम बाळगावा'

या अहवालात दावा करण्यात आला आहे की, हा हल्ला महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान आदी राज्यात होऊ शकतो. या महिन्यात गुप्तचर संस्थांनी जारी केलेल्या अहवालात हा नवीन दावा करण्यात आला आहे. जागतिक दहशतवादी संघटनांशी निगडीत दहशतवादी येणाऱ्या दिवसांत संभवतः आयईडी किंवा व्हीबीआयईडीचा उपयोग करुन आरएसएसची कार्यालये आणि त्यांच्या नेत्यांना तसेच पोलिस ठाण्यांवर हल्ला केला जाऊ शकतो. 

पुणे: अ‍ॅसिड फेकण्याची धमकी देत विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार

सूत्रांनी दावा केला आहे की, सर्व संबंधित राज्यांना सुरक्षेसाठीचे योग्य ते पाऊल उचलण्यास सांगितले आहे. एका उच्च अधिकाऱ्याने दावा केला की, महाराष्ट्र, दिल्ली, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि आसाम राज्यातील सुरक्षा वाढवण्यात आली असल्याचा दावा एका उच्च अधिकाऱ्याने केला. पदाधिकाऱ्यांच्या सुरक्षेचाही आढावा घेतला जात आहे.

आयसीसीसमोर दोषी कोण ठरणार? बांगलादेशी की...

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:intel input claims rss offices leaders can be attacked by global terror groups with ieds vbieds