पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

होम क्वॉरंटाईनमध्ये असणाऱ्या दिल्लीकरांचा फोन ट्रॅक करण्याचा निर्णय

अरविंद केजरीवाल

देशातील कोरोना विषाणूचे वाढते संक्रमण थांबण्याच नाव दिसत नाही. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांचा आकडा हा वाढत असून आतापर्यंत देशात १ हजार ६०० लोकांना कोरोनाची लागण झाल्याची पृष्टी झाली आहे. कोरोनाने ३८ देशवासियांचा घेतला आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून विशेष प्रयत्न सुरु आहेत. दिल्ली सरकारने चक्क क्वॉरंटाईनचा सल्ला देण्यात आलेल्या लोकांचा फोन ट्रॅक करण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे. क्वॉरंटाईनवर लक्ष ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.  

कोरोनाविरोधात भारत-चीन मिळून लढावे लागेल : मोदी

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यासंदर्भात माहिती दिली. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा नियंत्रणात आहे. आपण अद्याप दुसऱ्या टप्प्यात असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यातील ज्या लोकांना होम क्वॉरंटाईनचा सल्ला दिलाय. त्यांचे फोन ट्रेस केले जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. 
केजरीवाल म्हणाले की, सरकारने जवळपास २५ हजार फोन नंबरची यादी पोलिसांकडे दिली आहे. उप-राज्यपाल अनिल बैजल यांच्यासोबत चर्चाकरुन क्वॉरंटाईनला मोबाईलवरुन ट्रॅक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिंगापूर पॅटर्नने क्वॉरंटाईनवर नजर ठेवली जाईल, असेही केजरीवाल यांनी सांगितले.

कोरोना : दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच विम्बल्डन स्पर्धा रद्द!

क्वॉरंटाईनचा सल्ला दिलेल्या लोकांच्या स्मार्टफोनच्या लोकेशनचा उपयोग सर्वात प्रथम चीनने केला होता. त्यानंतर सिंगापूरसह अन्य यूरोप राष्ट्रांनी क्वॉरंटाईनर नजर ठेवण्यासाठी स्मार्टफोनच्या माध्यमातून करडी नजर ठेवली होती. सरकारच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्याला वेळीच पकडण्यासाठी ही यंत्रणा फायदेशीर आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी वेळोवळी केंद्र आणि राज्य सरकारकडून सूचना दिल्या जात आहेत. पण अनेक ठिकाणी लोक नियमाच उल्लंघन करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने हा फंडा आजमवण्याचे ठरवले आहे.