पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोना विषाणूमुळे बेंगळुरुतील इन्फोसिसची इमारत केली रिकामी

इन्फोसिस

बेंगळुरुतील इन्फोसिसने आपल्या एका सॅटेलाईट कार्यालयाची इमारत रिकामी केली आहे. त्यांचा एक कर्मचारी कोरोनाच्या संशयित रुग्णाच्या संपर्कात आला होता, असे एका वृत्तात म्हटले आहे. 

मेयो रुग्णालयातून पळून गेलेले कोरोनाचे संशयित रुग्ण सापडले

कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी कर्नाटक सरकारने एअर कंडिशन असलेल्या ठिकाणांवरील आयटी आणि इतर व्यावसायिकांना घरुन काम करण्याचा सल्ला दिल्यानंतर हे प्रकरण समोर आले. 

कार्यालयातून जारी केलेल्या एका संदेशात म्हटले आहे की, आम्हाला आयआयपीएम इमारतीतील एका सदस्याच्या स्थितीबाबत माहिती मिळाली. हा कर्मचारी कोविड-१९ च्या संशयित रुग्णाच्या संपर्कात आला असेल.

खातेधारकांना दिलासा, येस बँकेवरील निर्बंध तीन दिवसांत हटणार

कंपनीच्या एका अधिकाऱ्याने शनिवारी 'पीटीआय-भाषा'शी बोलताना म्हटले की, आम्ही सावधगिरीचे पाऊल म्हणून आम्ही आयआयपीएम इमारत रिकामी केली आहे. इमारतीला सॅनिटाईज (रोगमुक्त) केले जात आहे. इन्फोसिस व्यवस्थापनाने आपल्या कर्मचाऱ्यांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. कर्नाटकमध्ये कोरोना विषाणूने संक्रमित सहा पैकी तिघे आयटी क्षेत्रात काम करणारे आहेत.

कोरोनाचा कहर: अमेरिका आणि स्पेनमध्ये राष्ट्रीय आणीबाणी जाहीर

दरम्यान, देशात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या वाढून शनिवारी ८३ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली. यामध्ये दिल्ली आणि कर्नाटकमधील एक-एक व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. सौदी अरेबियातून नुकताच परतलेले कलबुर्गी येथील ७६ वर्षीय व्यक्तीचा गुरुवारी मृत्यू झाला. तर दिल्लीतील एक ६८ वर्षीय महिलेचाही शुक्रवारी रात्री राम मनोहर लोहिया रुग्णालयात मृत्यू झाला होता.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Infosys evacuates building in Bengaluru after employee comes in contact with suspected COVID 19 patient