पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिहिणाऱ्या कर्मचाऱ्यावर इन्फोसिसने केली ही कारवाई...

इन्फोसिस कंपनी

ट्विटरवर कोरोना विषाणूच्या संक्रमणासंदर्भात आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या इन्फोसिसमधील कर्मचाऱ्याला कंपनीतून काढून टाकण्यात आले आहे. इन्फोसिसनेच ही माहिती दिली. 

लॉकडाऊन: पायी घरी जाणाऱ्या ७ जणांना टेम्पोने चिरडले, चौघांचा मृत्यू

इन्फोसिसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, संबंधित कर्मचाऱ्याने त्याच्या सोशल हँडलवर केलेले ट्विट कंपनीच्या नियमावलीचे उल्लंघन करणारे आहे. कंपनीने या संदर्भात सर्व चौकशी पूर्ण केली आहे. कंपनीच्या संबंधित कर्मचाऱ्यानेच ती पोस्ट टाकल्याची खात्री पटल्यानंतरच त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. अशा स्वरुपाच्या प्रकरणांमध्ये कंपनी कोणतीही चुकीची वर्तणूक अजिबात खपवून घेणार नाही. त्यामुळे त्या कर्मचाऱ्याला तात्काळ प्रभावाने कामावरून काढून टाकण्यात येत आहे.

गेल्या गुरुवारी या कर्मचाऱ्याने त्याच्या ट्विटर हँडलवर हे एक ट्विट केले होते. त्यामध्ये त्याने घरातून बाहेर पडा. एकमेकांच्या हातात हात द्या आणि विषाणूचा फैलाव वाढवा, असे म्हटले होते. 

COVID 19 : इटलीत २४ तासांत विक्रमी मृत्यूतांडव!

या ट्विटनंतर लगेचच इन्फोसिसने अशा स्वरुपाच्या ट्विटमुळे आम्हाला चिंता वाटती आहे. लवकरच चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई केली जाईल, असे म्हटले होते.