पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाच्या लढ्यात मोठा दिलासा; लॉकडाऊनमुळे संसर्ग झाला कमी

कोरोना विषाणूबाधितांच्या संख्येतील वाढ कमी झाली आहे. (संग्रहित छायाचित्र)

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मोदी सरकारने घोषीत केलेल्या २१ दिवसांच्या लॉकडाऊनपैकी १४ दिवसांचा महत्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. कोरोनाच्या प्रकरणात ६०० वरून वाढ होत जवळपास ती ४,८०० पर्यंत पोहचली. मात्र कोरोना प्रकरणांमध्ये वाढ होण्याचे प्रमाण थोडेसे कमी झाले आहे. लॉकडाऊन सुरु होण्याच्या वेळी संक्रमणाचे प्रमाण १७ टक्के होते. मात्र लॉकडाऊन दरम्यान तबलिगी जमातमुळे झालेल्या संसर्गाची प्रकरणं सोडली तर कोरोना प्रकरणांमध्ये घट झाली आहे. 

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा १०१८ वर, १५० नव्या रुग्णात भर

आता संसर्गाच्या प्रमाणात आठ टक्क्यांनी घसरण होत ९ टक्क्यांवर आले आहे. यामध्ये तबलिगी जमातमुळे संसर्ग झालेल्या प्रकरणांचा समावेश केला गेला तरी सुद्धा हे प्रमाण १२ टक्क्यांवर येत आहे. लॉकडाऊनमध्ये कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचे प्रमाण कमी झाले. ज्या देशात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे त्याठिकाणी दिवसाला ५० ते १०० टक्के कोरोनाच्या प्रकारणात वाढ झाली आहे. 

CM ठाकरेंच्या १६० जणांच्या सुरक्षा ताफ्यावर क्वॉरंटाइनची वेळ!

वर्धमान महावीर मेडिकल कॉलेजच्या कम्युनिटी मेडिसिन विभागाचे प्राध्यापक जुगल किशोर यांनी सांगितले की, १४ दिवसांमध्ये कोरोनाच्या संसर्गाचे चक्र वाढत जाते. त्यामुळे कोरोना वेगाने पसरत जातो. यामध्ये समुदाय संसर्गाचा सर्वात जास्त धोका असतो. तर सध्याच्या आकडेवारीनुसार पाहिले तर १४ दिवसांमध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यात देशाला यश आले आहे. देशात कोरोनाचा वाढता संसर्ग कमी झाला आहे. पुढच्या आठवड्यात कोरोनाच्या संसर्गात आणखी घट होईल, असे सांगितले जात आहे. 

कोविड-१९: पुण्यातील सील करण्यात आलेल्या परिसरात कर्फ्यू लागू