पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पी. चिदंबरम आणि पुत्र कार्तीला ५० लाख डॉलरची लाच दिली, इंद्राणी मुखर्जींचा दावा

इंद्राणी मुखर्जी

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम आणि त्यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांना ५० लाख डॉलरची लाच दिल्याचा दावा इंद्राणी मुखर्जी यांनी केला आहे. परदेशांत सिंगापूर, मॉरिशअस, बर्म्युडा, इंग्लंड आणि स्वित्झर्लंडचा समावेश आहे. सीबीआयने आयएनएक्स मीडिया प्रकरणांत शुक्रवारी विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. त्यात या आरोपांचा समावेश आहे.

विश्वास ठेवू नका, १००० रुपयांच्या नोटेचे व्हायरल झालेले फोटो खोटे

यासंबंधी विदेशातून न्यायिक सहयोगासाठी पत्र लिहिले आहे, त्याच्या उत्तराची प्रतिक्षा केली जात असल्याचे सीबीआयने म्हटले आहे. तपास यंत्रणेने चार कंपन्या आणि आठ लोकांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये १२० बी, ४२०, ४६८, ४७१ आदि कलमे लावण्यात आले आहे. 

हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारींची गोळ्या झाडून निर्घृण हत्या

इंद्राणी मुखर्जी या प्रकरणात सरकारी साक्षीदार झाल्या आहेत. त्या सध्या आपली मुलगी शीना बोराच्या हत्येप्रकरणी मुंबईत कारागृहात कैद आहेत. इंद्राणी यांनी सीबीआयला दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, लाचेच्या रकमेप्रकरणी आपण मार्च-एप्रिल २००७ मध्ये पी. चिदंबरम यांची भेट घेतली होती. सीबीआयने आयएनएक्स मीडिया प्रा. लि.ला मिळालेल्या ४०३.०७ कोटी रुपये विदेशी गुंतवणुकीसाठी मे २००७ मध्ये गुन्हा दाखल केला होता.

अभिजित बॅनर्जी डाव्या विचारांचे, पियुष गोयल यांची टीका

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Indrani Mukerjea claims to have paid 5 million dollar to P Chidambaram son Karti in bribe says CBI chargesheet