पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

इंडिगोचे सर्व्हर डाऊन, विमानसेवेवर परिणामामुळे प्रवाशांना मनस्ताप

इंडिगो

इंडिगो विमानसेवेचे नियंत्रण करणारे सर्व्हर डाऊन झाल्यामुळे त्याचा परिणाम या विमानसेवेच्या दैनंदिन कामाकाजावर होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सोमवारी सकाळीच इंडिगोचे सर्व्हर डाऊन झाल्यामुळे वेगवेगळ्या विमानतळावरील कंपनीच्या विमानसेवेला फटका बसण्यास सुरुवात झाली.

बाळासाहेब हयात असते तर भाजपनं एवढं धाडस केलं असतं का?: रोहित पवार

इंडिगोचे सर्व्हर तातडीने पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत, असे कंपनीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. इंडिगो ही देशातील मोठ्या विमानसेवा कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीकडून देशांतर्गत एकूण हवाई प्रवाशांच्या ५० टक्के प्रवाशांची दररोज ने-आण केली जाते.  

आता 'तरूण भारत'मधून संजय राऊतांवर निशाणा, बेताल म्हणून टीकास्त्र

इंडिगोच्या विमानसेवेवर परिणाम झाल्यानंतर अनेक प्रवाशांनी ट्विटरच्या माध्यमातून याबद्दल नाराजी व्यक्त केली. मुंबईमध्ये विमानतळावर इंडिगोच्या प्रवाशांची मोठी रांग लागल्याचे दिसते. नक्की काय झालंय आणि ही अडचण कधी दूर होईल, हे कोणीच सांगू शकत नसल्याचे एका प्रवाशाने ट्विटच्या माध्यमातून सांगितले.