पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

CAA: वाहतूक कोंडीत अडकले वैमानिक; इंडिगोच्या १९ विमानांचे उड्डाण रद्द

दिल्लीत वाहतूककोंडी

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात दिल्लीमध्ये जोरदार आंदोलन सुरु आहे. या आंदोलनामुळे दिल्लीतील विमानसेवेवर परिणाम झाला आहे. दिल्ली-गुरुग्राम एक्स्प्रेसवर सकाळपासून मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. जवळपास १५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. याचे कारण आहे दिल्ली पोलिस दिल्लीमध्ये येणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करत आहेत. या वाहतूक कोंडीमध्ये इंडिगो एअरलाईन्सचे कर्मचारी देखील अडकले आहेत. त्यामुळे इंडिगोच्या १९ विमानांची उड्डाणं रद्द झाली आहेत.

दिल्ली आंदोलन: काही मेट्रो स्टेशन सुरु, वाहतूक कोंडीमुळे प्रवासी हैराण

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात सुरु असलेल्या आंदोलनामुळे दिल्लीच्या सीमेपासून ते गुडगावच्या राजीव चौकपर्यंत जवळपास १५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. या वाहतूक कोंडीमध्ये इंडिगो एअरलाईन्सचे पायलट, एअरहोस्टेस आणि इतर कर्मचारी अडकले आहेत. त्यामुळे दिल्लीतून उड्डाण घेणारी इंडिगोची १९ विमानांची उड्डाणं रद्द झाली आहेत. तर १६ विमानसेवा उशिराने सुरु आहेत. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी ट्विट करत या मार्गावर वाहतूक कोंडी झाल्यामुळे प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन केले आहे. 

निर्भया प्रकरणः दोषी पवनची याचिका कोर्टाने फेटाळली; वकिलाला दंड

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:indigo has cancelled 19 flights and 16 flights have been delayed due to traffic jam at nh8