पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भारतातील पहिल्या महिला मरिन पायलट कोरोना संशयित, रुग्णालयात दाखल

कोरोना विषाणू

भारतातील पहिल्या महिला मरिन पायलटला (जहाज संचालन) कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचा संशय आहे. या महिलेला कोलकात्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोरोना विषाणू संशयित म्हणून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

कोरोना विषाणूमुळे राज्यातील सर्व निवडणूक प्रक्रिया स्थगित

कोलकाता पोर्ट ट्रस्टचे प्रवक्ते संजॉय मुखर्जी म्हणाले, सोमवारी रात्री त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच त्या सुटीनिमित्त कोलंबोला गेल्या होत्या. त्यांना ताप आणि खोकल्याचा त्रास सुरू झाला आहे. 

२०११ मध्ये त्या कोलकाता पोर्ट ट्रस्टमध्ये कामावर रुजू झाल्या होत्या. गेल्यावर्षीच त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नारीशक्ती सन्मानाने गौरविण्यात आले होते. 

कोरोनावर खासगी रुग्णालयातही उपचार घेता येतील - आरोग्यमंत्री

या महिलेच्या स्वॅबचे नुमने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांना सध्या आयडी एँड बीजी रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. कोलकात्यामध्ये आतापर्यंत कोणालाही कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आलेले नाही.