पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

केवळ एकच अंतराळवीर गगनयानमधून अंतरिक्षात जाण्याची शक्यता

के सिवन

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून (इस्रो) पुढील वर्षी मानवाला घेऊन अंतराळात पाठविण्यात येणाऱ्या गगनयान मोहिमेबद्दल इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. या मोहिमेसाठी सध्या चौघांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली असली, तरी एकाच अंतराळवीराला घेऊन २०२१ च्या अखेरिस हे यान अंतराळात झेपावण्याची शक्यता आहे, असे त्यांनी म्हटले आहे. या मोहिमेसाठी निवडलेल्या चार अंतराळवीरांना याच महिन्यापासून रशियामध्ये प्रशिक्षण देण्यात येणार आहे. एकूण ११ महिने हे प्रशिक्षण देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

राजकीय वर्तुळात फडणवीस अन् दुसऱ्या ठाकरेंच्या भेटीची चर्चा!

गगनयान मोहिमेसाठी भारताला अंदाजे १० हजार कोटी इतका खर्च येणार आहे. या मोहिमेसाठी भारतीय हवाई दलातील चौघांची निवड करण्यात आली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून पृथ्वीभोवती २००० किलोमीटरच्या परिघात संशोधनाचे काम करण्यात येईल. 

१५ ऑगस्ट २०१८ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून देशवासियांना उद्देशून केलेल्या भाषणामध्ये या मोहिमेची घोषणा केली होती. २०२२ मध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षी भारतीय तिरंगा घेऊन देशाची मुलगी किंवा मुलगा अंतरिक्षात झेपावेल, असे त्यांनी त्यावेळी म्हटले होते.

अमेरिकेच्या लष्करी तळावर इराणचा हल्ला, १२ हून अधिक क्षेपणास्त्रे डागली

दरम्यान, या मोहिमेसाठी नक्की कोणाची निवड करण्यात आली आहे. याची कोणतीही माहिती सिवन यांनी दिली नाही. त्यांनी केवळ सांगितले की गगनयानसाठी चार पुरुषांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये कोणीही महिला नाही. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापासून निवडलेल्या जवानांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात होईल, असे इस्रोने आधीच म्हटले आहे.