पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोना विषाणू: केरळमध्ये आढळला पहिला रुग्ण

कोरोना विषाणू

केरळमध्ये प्राणघातक कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली आहे. हा विद्यार्थी चीनमधील हुआन विद्यापीठात शिक्षण घेत होता. तो चीनवरुन भारतात आला आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून उपचार सुरु आहे. केरळमध्ये त्याच्यावर उपचारासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे.

...म्हणून दिल्लीची मातोश्री शक्तीशाली झाली: सुधीर मुनगंटीवार

चीनमध्ये झपाट्याने पसरणाऱ्या जीवघेणा कोरना विषाणूने आतापर्यंत १७० नागरिकांचा बळी घेतला आहे. तर ७००० पेक्षा जास्त नागरिकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. दरम्यान, या विषाणूने आता भारतात शिरकाव केला आहे. कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण भारतातील केरळमध्ये आढळला आहे. चीनमधून भारतात आलेल्या सर्वांची तपासणी केली जात आहे. देशातील अनेक राज्यामध्ये कोरोना विषाणूच्या संशयित रुग्णांना डॉक्टरांच्या नियंत्रणाखाली ठेवण्यात आले आहेत. एकट्या केरळमध्ये ८०६ जणांना डॉक्टरांच्या नियंत्रणाखाली ठेवण्यात आले आहे. 

....तर चोख प्रत्युत्तर दिले जाईल; अशोक चव्हाणांचा इशारा

दरम्यान, कोरोना विषाणूमुळे भारतातील दोन विमान कंपन्यांनी चीनला जाणारी विमानसेवा स्थगित केली आहे. कोरोनामुळे एअर इंडियाची विमानसेवा ३१ जानेवारी ते  १४ फेब्रुवारीदरम्यान  स्थगित करण्यात आली आहे. तर इंडिगोची भारत- चीन विमानसेवा १ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारीदरम्यान स्थगित करण्यात आली आहे. तर चीनच्या हुबेई प्रांतात अडकलेल्या भारतीयांना एअरलिफ्टने आणले जाणार आहे. 

जामिया परिसरात इतरांच्या दिशेने पिस्तूल रोखत तरुणाची दहशत