पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आता या देशात जाण्यासाठी व्हिसाची गरज नाही

जेर बोलसोनारो

चीन आणि भारतातील नागरिकांना यापुढे ब्राझीलमध्ये जाण्यासाठी व्हिसाची गरज पडणार नाही. ब्राझीलचे अध्यक्ष जेर बोलसोनारो यांनी गुरुवारी याची घोषणा केली. या वर्षाच्या सुरुवातीलाच बोलसोनारो ब्राझीलमध्ये सत्तेवर आले आहेत. 

आदित्य ठाकरे राज्याचे भावी मुख्यमंत्री, वरळीत पोस्टरबाजी

सत्तेवर आल्यानंतर लगेचच जेर बोलसोनारो यांनी विकसित देशांसाठी व्हिसा नियम शिथिल केले होते. पण हाच नियम आता काही विकसनशील देशांसाठीही लागू करण्यात आला आहे. त्यामुळे यापुढे चीन आणि भारत या दोन्ही देशांतील नागरिकांना ब्राझीलला जाताना व्हिसा काढण्याची गरज पडणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र आणि हरियाणातील निकालांनंतर भाजपला आणखी एक धक्का

या आधी अमेरिका, जपान, कॅनडा, ऑस्ट्रेलिया या देशांतील नागरिकांसाठी ब्राझीलने व्हिसा नियम शिथिल केले आहेत. दरम्यान, या देशांनी मात्र ब्राझीलमधील नागरिकांसाठी व्हिसा नियमांमध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत. म्हणजेच ब्राझीलमधील नागरिकांना या देशात जाण्यासाठी व्हिसा घेणे बंधनकारक आहे.