पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाचा प्रतिकार करण्यात भारतीय मानसिकदृष्ट्या सक्षम - चिनी तज्ज्ञ

चीनमध्ये कोविड १९ आजाराशी लढण्यासाठी धोरण आखण्यामध्ये झॅंग वेनहाँग यांनी महत्त्वाची भूमिका निभावली आ

भारतातील लोक शारीरिकपेक्षा मानसिकदृष्ट्या कोरोना विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी सक्षम असल्याचे चीनमधील संसर्गजन्य आजार विषयातील एका तज्ज्ञाने म्हटले आहे. सध्या भारतात असलेल्या चिनी विद्यार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले. झॅंग वेनहाँग असे या तज्ज्ञाचे नाव आहे.

कोरोनाचा वेग मंदावला, काही आठवड्यांत मात करण्याची आशा: हर्षवर्धन

झॅंग यांनी सांगितले की, मी एकदा चीनमध्ये टीव्हीवर भारतातील एका धार्मिक कार्यक्रमाची बातमी पाहिली. या कार्यक्रमात आलेल्या लोकांनी मास्क लावला नव्हता. ते तसेच सहभागी झाले होते. याचा अर्थ भारतीय लोक या आजाराशी लढण्यासाठी शारीरिकदृष्ट्या सक्षम आहेत, असा नाही तर ते मानसिकदृष्ट्या सक्षम आहेत, असाच निघतो. भारतीय लोक अत्यंत शांत चित्ताने राहणार आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

निकोटिनमुळे कोरोनाचे संक्रमण रोखले जाऊ शकते, नवे संशोधन

चीनमध्ये कोविड १९ आजाराशी लढण्यासाठी धोरण आखण्यामध्ये झॅंग वेनहाँग यांनी महत्त्वाची भूमिका निभावली आहे. भारतात कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या वाढत असली, तरी ती अमेरिकेच्या तुलनेत नक्कीच कमी आहे. त्याचबरोबर भारतात एकूण लोकसंख्येच्या १० टक्केपेक्षा जास्त लोकांना या विषाणूचा संसर्ग होणार नाही. त्यास्थितीत देशातील ९० टक्के जनता या विषाणूच्या संसर्गापासून दूर राहिल, असेही मत त्यांनी व्यक्त केले आहे.