भारतात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या लोकांची संख्या एक एप्रिलला १५०० पेक्षा जास्त झाली होती. पण रुग्णांची संख्या या आकड्यापर्यंत येण्यासाठी आपल्याला ६३ दिवस लागले. जगातील ज्या इतर देशांमध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. तेथील संक्रमणाच्या वेगापेक्षा भारतात हा वेग निश्चितच खूप कमी आहे. इराणमध्ये या विषाणूच्या संक्रमणाचा दर सर्वाधिक आहे. इराणमध्ये १९ फेब्रवारीला कोरोना विषाणूची लागण झालेला पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर १३ दिवसांतच या देशात संसर्ग झालेल्या रुग्णांचा आकडा १५०० च्यावर गेला होता.
कोरोनावर लस निर्मितीसाठी DNA-RNA आधारित पद्धतीमुळे वेग
१५०० रुग्णांचा आकडा पार करण्यासाठी अमेरिकेला ५३, इटलीला ३२ तर स्पेनला ४० दिवस लागले होते. त्या तुलनेत भारताला हा आकडा गाठण्यासाठी ६३ दिवस लागले आहेत. त्यामुळेच या विषाणूच्या संक्रमणाचा दर भारतात तुलनेत कमी असल्याचे म्हटले जात आहे. यासोबतच या आजारामुळे मृत पावलेल्यांची संख्याही भारतात इतर देशांच्या तुलनेत कमी आहे. ६३ दिवसांच्या कालावधीमध्ये भारतात ३८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्र सरकारने देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे परिस्थिती अजून नियंत्रणात असल्याचे म्हटले जात आहे.
रामनवमी निमित्त पंतप्रधान मोदींचे टि्वट, म्हणाले, जय श्रीराम !
चीनमध्ये ११ डिसेंबर २०१९ रोजी कोरोना विषाणूची लागण झालेला पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर ४६ दिवसांत ही संख्या १५०० च्या वर गेली होती. या कालावधीत तिथे ५६ लोकांचा मृत्यू झाला होता. अमेरिकेचा विचार केला तर तिथे २० जानेवारीला पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर ५३ दिवसांनी रुग्णांचा आकडा १५०० च्या वर गेला होता. या कालावधीत तिथे ४१ लोकांचा मृत्यू झाला होता.