पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अन्न-पाण्याचा तुटवडा, चीनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचं मदतीसाठी साकडं

कोरोना विषाणू

चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे आणीबाणीची परिस्थिती आहे. आतापर्यंत १३१ लोकांचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. चीनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी आता मदतीसाठी भारत सरकारकडे साकडं घातलं आहे. झपाट्यानं पसरत चाललेल्या या आजारामुळे चीनमधलं वुहान शहर पूर्णपणे बंद आहे. इथे आम्ही अडकलो आहोत त्यामुळे अन्न- पाण्याचा इथे अक्षरश: तुटवडा जाणवत आहे, त्यामुळे आम्हाला या शहरातून बाहेर काढण्यासाठी तातडीनं प्रयत्न करावे अशी याचना इथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी केली आहे. 

काळोखात पाप करु नका, शिवसेनेचा मोदी सरकारला टोला

वुहान शहरातही झपाट्यानं हा व्हायरस पसरत आहे.  आम्हाला घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे आम्ही  विद्यापिठाच्या कॅम्पसमध्येच अडकलो आहोत. आम्हाला दिवसातून केवळ दोन तासच गरजेच्या वस्तू आणण्यासाठी बाहेर पडण्याची परवानगी दिली आहे. मात्र शहरातील दुकानं, वाहतूक पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे साठवून ठेवलेल्या वस्तूंचा लवकरच तुटवडा जाणवेल. आमच्याकडे उपलब्ध असलेला अन्न आणि पाण्याचा साठा जवळपास संपत आला आहे, त्यामुळे आमची तातडीनं मदत करा अशी मागणी इथे अडकलेल्या विद्यार्थ्यांनी एएनआय वृत्तसंस्थेला  दिलेल्या प्रतिक्रियेत केली आहे. 

बोर्डिंग गेटपर्यंत जाणे ही प्रवाशांची जबाबदारी, सुप्रीम कोर्टाचा निकाल

चीनमध्ये अडकलेले भारतीय विद्यार्थी हे महाराष्ट्र, आसाम, पश्चिम बंगाल, जम्मू , काश्मीर आणि दिल्लीतील रहिवाशी आहेत. आठ विद्यार्थ्यांचा गट वुहान विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये आहे. या व्यतिरिक्त ट्रेनिंग घेण्यासाठी चीनमध्ये आलेला ५८ जणांचा गटही वुहानमध्ये अडकला आहे. कोरोना विषाणूमुळे वुहान आणि त्याच्या आसपासच्या परिसरात सुमारे ५० दशलक्ष लोकांना घरात किंवा इमारतीत बंद करुन ठेवले आहे. पुढील आदेशापर्यंत अनुमतीशिवाय शहराबाहेर जाण्यास येथील नागरिकांना बंदी घालण्यात आली आहे.