पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अमेरिकेत भारतीय नागरिकाची गोळ्या झाडून हत्या

गोळीबार

अमेरिकेच्या लॉस एंजिलिस शहरामध्ये शनिवारी एका भारतीय व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. गोळीबारानंतर घटनास्थळावरुन आरोपी फरार झाले. मनिंदर सिंह (३१ वर्ष) असे मृत व्यक्तीचे नाव असून तो हरियाणातील कर्नाल जिल्ह्यातील रहिवासी आहे. 

'मोदी सरकारनं केलेल्या कामाची पाहणी ट्रम्प कधी करणार?'

मिळालेल्या माहितीनुसार, मनिंदर सिंह व्हिटियर शहरातील किरणामालाच्या दुकानात नोकरी करत होता. सहा महिन्यापूर्वी तो अमेरिकेत नोकरीनिमित्त आला होता. मनिंदर सिंह याचे लग्न झाले असून त्याला दोन लहान मुलं आहेत. तर, 'मनिंदर कुटुंबामध्ये एकमेक कर्ता व्यक्ती होता. जो पगार मिळायचा तो त्याच्या कुटुंबियांना पाठवून देत असे', अशी माहिती मनिंदरच्या नातेवाईकांनी दिली आहे. 

ISISच्या संशयावरुन कर्नाटक, तामिळनाडूत एनआयएचे २० ठिकाणी छापे

व्हिटियर पोलिसांनी सांगितले की, 'शनिवारी पहाटे ५.४३ वाजता ही घटना घडली आहे. पोलिसांनी संशयित आरोपीचा फोटो जारी केला आहे. कोणतेही कारण नसताना आरोपीने गोळीबार केला त्यामध्ये मनिंदर सिंह याचा मृत्यू झाला. गोळीबारानंतर आरोपी घटनास्थळावरुन पळून गेला. आरोपीने तोंड झाकलेले होते. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. 

डोनाल्ड ट्रम्प येण्याआधीच आग्र्याला पोहचले गंगाजल

दरम्यान, मनिंदरच्या भावाने त्याचा मृतदेह भारतामध्ये आणण्यासाठी 'गो-फंड पेज' तयार केले आहे. जेणे करुन मनिंदरचा मृतदेह  भारतात आणता येईल. मनिंदरच्या भावाने असे सांगितले आहे की, 'मनिंदरच्या कुटुंबामध्ये आई-वडील, पत्नी, ५ आणि ९ वर्षांची दोन मुलं असा परिवार आहे. मनिंदरचा मृतदेह भारतात पाठवण्यात यावा जेणे करुन आम्ही त्याला शेवटचे पाहू शकू.'

अशी असेल ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याची रुपरेषा