पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रेल्वे मंत्री म्हणतात, रेल्वेच्या १६६ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच हे घडलंय...

रेल्वे मंत्री पियूष गोयल

भारतीय रेल्वेच्या १६६ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच चालू वर्षात रेल्वेच्या अपघातात कोणत्याही प्रवाशाला आपला जीव गमवावा न लागल्याची घटना घडली असल्याचे रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी म्हटले आहे. भारतीय रेल्वेने केलेल्या दाव्यानुसार आतापर्यंतच्या चालू आर्थिक वर्षामध्ये रेल्वेच्या अपघातात कोणत्याही प्रवाशाचा मृत्यू झालेला नाही. रेल्वेच्या शब्दांत याला 'झिरो पॅसेंजर डेथ' म्हणतात. पियूष गोयल यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून याबद्दलची माहिती ट्विट केली आहे. 

आता ग्रामविकास, कृषी किंवा सहकारपैकी एक खाते काँग्रेसला हवे

पियूष गोयल यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, सेफ्टी फर्स्ट : १६६ वर्षांच्या रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच चालू आर्थिक वर्षात भारतीय रेल्वेत एकाही प्रवाशाचा मृत्यू झालेला नाही. 

दुसऱ्या एका ट्विटमध्ये ते म्हणतात की, रेल्वेसेवांच्या एकीकरणामुळे त्यांचा दर्जा, कार्यशैली आणि निर्णय घेण्याची प्रक्रिया या सर्वांमध्ये महत्त्वाचे बदल होतील. जागतिक दर्जाची रेल्वे सेवा देण्याच्या आमच्या संकल्पाच्या दिशेने टाकलेले हे एक पाऊल आहे. यामुळे रेल्वे सेवा आणखी चांगली होईल आणि विकासात आपले योगदान देईल.

दिल्लीतून उगम पावलेलं ग्रहण कधी सुटणार?, धनंजय मुंडेंचा खोचक सवाल

मिळालेल्या माहितीनुसार, झिरो पॅसेंजर डेथ या संकल्पनेत केवळ रेल्वे दुर्घटना किंवा अपघातात झालेल्या मृत्यूचा विचार केला जातो. इतर कोणत्या कारणामुळे रेल्वे मार्गावर कोणत्या प्रवाशाचा मृत्यू झाला असेल, तर त्याचा यामध्ये समावेश केला जात नाही.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:indian railways reports zero passenger deaths in fy20 first time in 166 years says railway minister piyush goyal