पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रेल्वे, हवाई वाहतूक ३ मे पर्यंत बंद राहणार

भारतीय रेल्वे

प्रवासी रेल्वे वाहतूक, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक ही ३ मेपर्यंत बंद राहणार अशी मोठी घोषणा भारतीय रेल्वे आणि  हवाई मंत्रालयाकडून करण्यात आली आहे. ट्विटरच्या माध्यमातून या घोषणा करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनचा कालावधी ३ मेपर्यंत वाढवल्यानंतर भारतीय रेल्वे आणि  हवाई मंत्रालयानं ही महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. 

नरेंद्र मोदींच्या भाषणानंतरचे ५ महत्त्वाचे प्रश्न आणि त्याची उत्तरे

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  २४ मार्चपासून राज्यात टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर राज्यातील लोकल आणि एक्स्प्रेस सेवा बंद करण्यात आल्या. पंतप्रधानांनी २५ मार्चला लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर संपूर्ण देशात प्रवासी रेल्वे सेवा बंद करण्यात आल्या आहे, पण १५ एप्रिलनंतरचं तिकीट बुकिंग सुरु होतं. तर  गेल्या महिन्यात हवाई उड्डाणंही रद्द करण्यात आली आहे. केवळ अत्यावश्यक गोष्टींसाठी हवाई सेवा ही सुरु आहे.

पंतप्रधानांच्या घोषणेनंतर एक्स्प्रेस, प्रवासी ट्रेन आणि राज्यातील लोकल सेवा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाकडून घेण्यात आला आहे. यापूर्वी  रेल्वे प्रवाशांनी त्यांच्या २१ मार्च ते १५ एप्रिल या कालावधीतील रेल्वे प्रवासाचे आगाऊ आरक्षित केलेले तिकीट रद्द केले तर त्यांना त्याचा १०० टक्के परतावा दिला जाईल, असे रेल्वेने स्पष्ट केले होते. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी रेल्वेने आपल्या तिकीट रक्कम परताव्याच्या नियमांमध्येही आवश्यक बदल तात्पुरत्या स्वरुपात केले आहेत.

धारावीत कोरोनाबाधितांचा आकडा ५५ वर, ७ रुग्णांचा मृत्यू

तर दुसरीकडे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा ही ३ मेपर्यंत ११.५९ मिनिटांपर्यंत खंडीत राहिल  असं हवाई मंत्रालयानं ट्विट करुन सांगितलं आहे.