पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प्रवाशांनो कृपया लक्ष द्या, रेल्वे तिकीटाचे दर वाढण्याचे संकेत..

रेल्वे

रेल्वे मंडळाचे अध्यक्ष व्ही के यादव यांनी रेल्वेचे तिकीट दर वाढण्याचे संकेत दिले आहेत. रेल्वे प्रवासी आणि माल भाड्याचे दर तर्कसंगत करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. पण या प्रक्रिये अंतर्गत किती भाडे वाढवले जाणार आहे, याची माहिती देण्यास त्यांनी नकार दिला आहे. 

अमृता फडणवीस विरुद्ध शिवसेना; ठाणे पालिका अ‍ॅक्सिस बँकेतील खाती बंद करणार

व्ही के यादव म्हणाले की, भारतीय रेल्वेने घटत्या महसुलाचा सामना करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. भाडे वाढवणे हा संवेदनशील मुद्दा आहे, आणि अंतिम निर्णय घेण्यापूर्वी यावर दीर्घ चर्चेची गरज आहे. माल भाडे आधीच जास्त आहे. त्यामुळे आमचे लक्ष्य जास्तीत जास्त वाहतूक रस्त्यावरुन रेल्वेकडे आणण्याचे आहे. 

तरुणाला मारहाण करुन मुंडण करणाऱ्या ४ शिवसैनिकांना अटक

माहिती अधिकारा अंतर्गत मागवण्यात आलेल्या माहितीनुसार, चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीत रेल्वेच्या प्रवासी भाड्यातून उत्पन्न वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत १५५ कोटी रुपये आणि माल वाहतुकीतून ३९०१ कोटी रुपये कमी राहिले आहे. 

टीव्ही अभिनेता कुशल पंजाबीची राहत्या घरात आत्महत्या