पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भारतीय खेळाडूंनी सुषमा स्वराज यांना वाहिली श्रध्दांजली

सुषमा स्वराज

भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने मंगळवारी रात्री त्यांचे निधन झाले. 67 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुषमा स्वराज यांचे अचानक निधन झाल्यामुळे संपूर्ण देशभरामध्ये दु:ख व्यक्त केले जात आहे. सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर ट्विटरच्या माध्यमातून अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करत त्यांना श्रध्दांजली वाहिली आहे. भारतीय खेळाडूंनी देखील सुषमा स्वराज यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे.

भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाने अतिशय भावनिक ट्विट करत सुषमा स्वराज यांना श्रध्दांजली वाहिली. 'सुषमा स्वराज यांचे अचानक निधन झाल्यामुळे मी हैराण झाली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 'गर्ल चाईल्ड' अभियानामध्ये ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून काम केल्याचा मला अभिमान वाटतो. मी त्यांच्यासोबत असलेल्या नात्याला कायम संभाळून ठेवेल', असे ट्विट करत सानिया मिर्झाने दु:ख व्यक्त केले आहे.क्रिकेटपटू हरभजन सिंह याने देखील सुषमा स्वराज यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करत ट्विटरच्या माध्यमातून त्यांना श्रध्दांजली वाहिली आहे. 

क्रिकेटपटू सुरेश रैना यांने सुषमा स्वराज या खऱ्या नेता असल्याचे म्हटले आहे. त्याने ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, 'सुषमा स्वराज यांच्या निधनावर अजूनही मला विश्वास बसत नाही. हे देशासाठी मोठे नुकसान आहे.' असे दु:ख व्यक्त करत रैनाने सुष्मा स्वराज यांना श्रध्दांजली वाहिली.

माजी भारतीय क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीरने देखील ट्विट करत दु:ख व्यक्त केले आहे. 'सुषमा स्वराज यांच्या निधनामुळे खूप दु:ख झाले. एक वरिष्ठ नेता आणि भाजपचा आधारस्तंभ असलेल्या सुषमा स्वराजांवर सर्व जण खूप प्रेम करायचे. त्यांचे नाव अशा नेंत्यामध्ये घेतले जाते जे नेहमी मदतीसाठी तयार असतात. त्यांच्या निधनामुळे भारताचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे कुटुंबिय आणि मित्रांच्या दु:खात मी सहभागी आहे.' अशा दु:खद भावना गौतम गंभीरने व्यक्त केल्या आहेत. 

भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग याने देखील ट्विटरच्या माध्यमातून सुषमा स्वराज यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे.

सुषमा स्वराज यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असून त्यांच्या आत्म्याला शांता लाभो असे भावनिक ट्विट करत हॉकीपटू श्रीजेश याने सुषमा स्वराज यांना श्रध्दांजली वाहिली आहे.