पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जपानमध्ये निवडणूक जिंकलेला पहिला पुणेकर

पुणेकर योगेंद्र पुराणिक

भारतीय वंशाचे पुणेकर योगेंद्र पुराणिक उर्फ योगी हे जपानमध्ये निवडणूक जिंकणारे पहिले भारतीय ठरले आहेत. योगी हे  जपानची राजधानी टोकियोमधील ‘इडोगावा म्युनिसिपल कॉर्पोरेशन’साठी  निवडणुकीच्या रिंगणात होते. २१ एप्रिल रोजी पार पडलेल्या मतदानात त्यांना ६ हजारांहून अधिक मतं मिळाली. 

'मला स्थानिक जपानी लोक आणि विदेशी नागरिक यांच्यामधला दुवा व्हायचं आहे,  आता पूर्णपणे जपानी होण्याची वेळ आली आहे अशा शब्दात योगींनी आपल्या भावना व्यक्त केल्यात .‘इडोगावा  मतदार संघात भारतीयांची संख्या ही अधिक आहेत. या ठिकाणी ४,३०० भारतीय नागरिक राहतात. तर या ठिकाणी कोरियन आणि चिनी नागरिकांचीही संख्या अधिक आहे. या नागरिकांनी योगी यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना निवडणुकीत जिंकून दिलं.  जपानमध्ये सध्या ३४ हजार भारतीय नागरीक राहत आहेत. 

'जपानच्या इतिसाहात पहिल्यांदाच एका भारतीयाला जपानी नागरिकांनी मतं दिली आहेत. या देशाच्या प्रगतीसाठी भारतीयांचं योगदानही मोलाचं  आहे, म्हणून कृतज्ञता व्यक्त करत जपानी नागरिकांनी योगी यांना निवडून दिलं',  अशी भावना लेखक शमशाद खान यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली. 'चेंजिंग डायनामिक्स ऑफ इंडिया जपान रिलेशन्स' या पुस्तकाचे ते लेखक आहेत. 

योगेंद्र हे माजी बँक कर्मचारी आहेत.  गेल्या १० वर्षांपासून योगी ‘कॉन्सीट्यूएंट डेमोक्रेटिक पार्टी ऑफ जपान’ (CDP) या पक्षामध्ये कार्यरत आहेत. १९९७ साली योगी शिक्षणानिमित्त जपानला  आले होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी जपानच्या आयटी कंपनीमध्ये काम करण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी बरीच वर्षे जपानमध्ये काम केले. गेल्या १५ वर्षांपासून ते इडोगावा येथे राहत आहेत.