पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भारतीय वंशाचे अभिजित बॅनर्जी यांच्यासह तिघांना अर्थशास्त्राचे नोबेल

अभिजित बॅनर्जी

भारतीय वंशाचे अमेरिकी अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी यांच्यासह एस्थर डफ्लो आणि मायकल क्रेमर यांना अर्थशास्त्रातील प्रतिष्ठेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. जागतिक गरिबी दूर करण्यासाठी या तिघांनी केलेल्या संशोधनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. 

पीएमसी बँक घोटाळा: राकेश वाधवानसह तिघांची रवानगी पोलिस कोठडीत

५८ वर्षांच्या अभिजित बॅनर्जी यांचा जन्म १९६१ मध्ये कोलकत्यात झाला होता. त्यांनी कलकत्ता विद्यापीठ आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी १९८८ मध्ये हार्वर्डमधून पीएच डी केली होती.

PMCच्या जॉय थॉमसांचे कारनामे, नाव बदलून पुण्यात १० मालमत्तांची खरेदी

नोबेल समितीने म्हटले आहे की, जागतिक गरिबी दूर करण्यासाठी या तिघांनी केलेले संशोधन निश्चितच उपयुक्त ठरले आहे. दोन दशकांच्या कालावधीत त्यांच्या प्रयोगशील वृत्तीमुळे विकासशील अर्थशास्त्राचे प्रारूप बदलले आहे. त्यामुळे या क्षेत्रात संशोधनाला आणखी वाव निर्माण झाला आहे.