पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कावड यात्रा: बरेली रेल्वे स्थानकात बॉम्ब स्फोट घडवण्याची धमकी

बरेली रेल्वे स्थानक

मुस्लीम समाज मोठ्या प्रमाणात असलेल्या परिसरातून कावड यात्रा काढली तर बरेली रेल्वे स्थानकात बॉम्ब स्फोट घडवून आणू, अशी धमकी इंडियन मुजाहिद्दीन (आयएम) या दहशतवादी संघटनेने दिली आहे. स्वत: इंडियन मुजाहिद्दीन संघटनेचा कमांडर असल्याचे सांगत मुन्ने खा उर्फ मुल्लाने पोलिस अधीक्षकांना पत्राच्या माध्यमातून ही धमकी दिली आहे. 

धमकीचे पत्र मिळाल्यानंतर पोलिस प्रशासनाची सतर्क झाले आहे.  या प्रकरणात कोणत्याही प्रकारे दुर्लक्ष करु नका, असे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. रेल्वे स्थानक परिसराच्या आसपास संशयीतांवर नजर ठेवली जात आहे. 
श्रावण महिन्यातील काळात हिंदू धर्मियांकडून कावड यात्रा काढली जाते. बरेलीमध्ये मागील दोन वर्षांपासून कावड यात्रेदरम्यान दोन समाजात तेढ निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. कावड यात्रेच्या मार्गावरुन दोन्ही समाजात तणावाचे वातावरण असते. 

दहशतवाद्यांना रोखणारे बेकायदा कृत्ये नियंत्रण विधेयक लोकसभेत मंजूर

पत्र कोणत्या ठिकाणावरुन पाठवण्यात आले यासंदर्भातील पोलीस कसून चौकशी करत आहेत. दरम्यान खबरदारी म्हणून रेल्वे स्थानक परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.