पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दोन आंबे चोरण्याच्या आरोपावरून दुबई विमानतळावरून भारतीयाला अटक

प्रातिनिधिक छायाचित्र

प्रवाशांच्या बॅगेतून दोन आंबे चोरल्याप्रकरणी दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून भारतीय कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. चोरीच्या आरोपाखाली त्याच्यावर खटला सुरू आहे.  २०१७ साली दुबई विमानतळावर काम करणाऱ्या २७ वर्षीय तरुणानं प्रवाशांच्या बॅगेमधून दोन आंबे चोरले होते. भारतात जात असलेल्या एका बॅगमधून आपण आंबे चोरल्याची कबुली या तरुणानं दिली होती. 

पावसासाठी बेडकांचं लावलं लग्न, अतिवृष्टी झाल्यानंतर घेतला काडीमोड

'मला तहान लागली होती, मी पाणी  शोधत होतो.  त्यावेळी मी फळांची पेटी उघडली  आणि त्यातले दोन आंबे मी खाल्ले अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली.' २०१८ साली त्याची पोलिसांनी चौकशी केली आणि समन्स देऊन त्याला सोडण्यात आलं.

बापरे ! गणेशाच्या हातातील लाडूसाठी मोजले तब्बल १७ लाख ६० हजार

मात्र आता त्याला पोलिसांनी चोरीच्या आरोपाखाली अटक केली आहे. हा तरुण भारतीय प्रवाशांच्या बॅगा उघडून पाहतो असं विमानतळावरच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालं आहे. जर संबधीत तरुण चोरीच्या प्रकरणात दोषी आढळला तर त्याला तुरुंगवासही होऊ शकतो तसेच दोन आंब्यांची किंमत आणि दंडही त्याला चुकवावा लागू शकतो. या प्रकरणातील खटल्याचा निकाल २३ सप्टेंबरला येणार आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Indian man working at the Dubai International Airport faced a trial for stealing two mangoes