पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

इग्लंडमध्ये लिफ्टच्या बहाण्याने महिलेवर बलात्कार करणाऱ्या भारतीयास ७ वर्षांची शिक्षा

अजय राणा

इंग्लंडमधील सफॉकमध्ये डिसेंबर २०१७ मध्ये एका महिलेवर गाडीत बलात्कार केलेल्या भारतीय आरोपीस स्थानिक न्यायालयाने सात वर्षांची शिक्षा सुनावली. अजय राणा असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याला गेल्या वर्षी स्पेनमध्ये अटक केली होती. त्यानंतर त्याला इंग्लंडकडे प्रत्यार्पित करण्यात आले. 

ज्युरींनी बहुमताने अजय राणा याला दोषी ठरविल्यानंतर न्यायालयाने त्याला सात वर्षांची शिक्षा सुनावली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ डिसेंबर २०१७ रोजी अजय राणा याने पहाटे पाचच्या सुमारास संबंधित महिलेला त्याच्या कारमध्ये लिफ्ट दिली. बाहेर खूप थंडी आहे. त्यामुळे तुम्हाला जिथे जायचे आहे, तिथे सोडतो, असे अजय राणा याने महिलेला सांगितले. त्याचबरोबर याआधीही दोघांना लिफ्ट दिली असल्याचे त्याने महिलेला सांगितले. महिलेला राणावर विश्वास वाटल्याने ती गाडीत बसली. पण अर्ध्या तासानंतर अजय राणाने गाडी थांबविली आणि गाडीतच महिलेवर बलात्कार केला. 

या घटनेनंतर घाबरलेल्या महिलेने गाडीतून पळ काढून जवळच असलेल्या मैत्रिणीचे घर गाठले. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. ज्या गाडीमध्ये राणाने बलात्कार केला, ती त्याच्या घरातील एका नोकराच्या नावावर नोंदणी केलेली होती. गाडीचा चालक म्हणून राणाने स्वतःचे नाव विमा पॉलिसीवर लावले होते. १२ डिसेंबर रोजी अजय राणा लंडनसाठी रवाना झाल्याचे त्याच्या मित्राने पोलिसांना सांगितले. आई आजारी असल्यामुळे तिला भेटण्यासाठी मी भारतात जात असल्याचे त्याने मित्राला सांगितले होते. 

शस्त्रक्रियेला घाबरून ११ वर्षांच्या मुलीची आत्महत्या

पोलिसांनी घटनास्थळी गोळा केलेले पुरावे आणि तिथे सापडलेले राणाच्या कानातील इअरफोन्स यांच्या साह्याने त्यांनी अजय राणाच यातील संशयित आरोपी असल्याचे निश्चित केले. त्याचबरोबर पीडितेने त्या दिवशी गाडीत बसल्यानंतर राणाने कोणत्या मार्गाने गाडी पुढे नेली याची दिलेली माहिती आणि त्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज हे सुद्धा पोलिसांनी बघितले. त्यामध्ये राणाची गाडी त्याच मार्गावरून पुढे जाताना दिसत होती.

राणाच यातील आरोपी असल्याचे पोलिसांनी निश्चित करेपर्यंत तो भारताच्या दिशेने निघाला होता. सफॉक पोलिसांनी राणाच्या प्रत्यार्पणाची तयारी सुरू केली. त्याचबरोबर सर्व युरोपिय देशांमध्ये राणासाठी अटक वॉरंट जारी केले. यामुळे युरोपिय देशांच्या समुहातील कोणत्याही देशामध्ये राणा आल्यास त्याला अटक केली जाईल. २२ ऑक्टोबर २०१८ रोजी स्पॅनिश पोलिसांनी त्याला विमानतळावरच अटक केली. यानंतर स्पॅनिश न्यायालयाने त्याला इंग्लंडकडे प्रत्यार्पित करण्यास मंजुरी दिली. १२ नोव्हेंबर २०१८ रोजी त्याला इंग्लंडमध्ये आणण्यात आले.