पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

इम्रान खान यांना आंतरराष्ट्रीय राजकारणाची समज नाही : भारत

इम्रान खान

संयुक्त राष्ट्र महासभेत (UNGA) काश्मीर मुद्यावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या तुर्कीसोबत मलेशिया सरकारचे भारताने कान टोचले आहेत. काश्मीर हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे. या ठिकाणच्या परिस्थितीचा आढावा न घेता यासंदर्भात कोणतेही भाष्य करु नये, असे परराष्ट्रमंत्रांलयाचे सचिव रविश कुमार यांनी दोन्ही राष्ट्रांना सुनावले.  

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकही FIR नाही

मलेशियाने काश्मीरसंबंधी केलेल्या टिप्पणीवरही त्यांनी यावेळी भाष्य केले. जम्मू काश्मीरने देशातील अन्य राज्याप्रमाणे इंस्ट्रूमेंट ऑफ एक्सेशनवर स्वाक्षरी केली आहे. मात्र पाकिस्ताननेच अवैधरित्या जम्मू काश्मीरच्या काही भागात घुसखोरी करुन ताबा मिळवला आहे. हे सर्व लक्षात ठेवून आणि मलेशियाने दोन्ही राष्ट्रांतील संबंधाचा विचार करुनच एखादे विधान करावे, असे भारताने म्हटले आहे.   

विधानसभेच्या प्रचारासाठी काँग्रेसने जाहीर केली स्टार

यावेळी त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचाही समाचार घेतला. सीमारेषेच्या दिशेने (LOC) मोर्चा वळवण्याची भाषा करणाऱ्या इम्रान खान यांना आंतरराष्ट्रीय राजकारणच कळत नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर संबंध कसे जोपासायची त्यांची क्षमता नाही. त्यामुळेच भडकाऊ विधाने करत असतात. भारताविरुद्ध जिहादची भाषा वापरणे अतिशय गंभीर असून याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे रविश कुमार यांनी म्हटले आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Indian external affairs ministry on strongly criticised Pakistan Prime Minister Imran Khans remarks that called for jihad against India