पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

VIDEO: अरबी समुद्रात अडकलेल्या २६४ मच्छिमारांची सुटका

 मच्छिमारांची सुटका

भारतीय तटरक्षक दलाने मंगळवारी अरबी समुद्रात अडकलेल्या २६४ मच्छिमारांची सुटका केली. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे समुद्र खवळलेला आहे. या खवळलेल्या समुद्रात मच्छिमारांच्या ५० बोटी अरबी समुद्रात अडकल्या होत्या. भारतीय तटरक्षक दलाला याची माहिती कळताच त्यांनी ताबडतोब मदकार्य सुरु करत सर्व मच्छिमारांची सुखरुप सुटका केली. तटरक्षक दलाने या बचावकार्यामध्ये व्यापारी जहाजांची मदत घेतली.

 

CM ठाकरे अन् PM मोदींच्या भेटीचा मुहूर्त ठरला!

तामिळनाडूमधील मच्छिमार संघटनांकडून भारतीय तटरक्षक दलाला माहिती मिळाली होती की, गोव्यापासून पश्चिमेला २५० नॉटिकल मैल अंतरावर मच्छिमारांच्या ५० बोटी अडकल्या आहेत. त्यानंतर भारतीय तटरक्षक दलाने आंतरराष्ट्रीय सुरक्षा जाळे सक्रिय करत या मच्छिमारांचे प्राण वाचवले.

पी.चिदंबरम यांची तिहार तुरुंगातून सुटका

या बचावकार्या दरम्यान भारतीय तटरक्षक दलाने समुद्रात असलेल्या सात व्यापारी जहाजांची मदत घेतली. बचावकार्यासाठी त्यांनी या व्यापारी जहाजांशी संपर्क करत मदत करण्यासाठी विनंती केली. या व्यापारी जहाजांनी देखील मदतकार्यात सहकार्य केल्यामुळे सर्व २६४ मच्छिमारांचे प्राण वाचले.

अन्यायकारक गुन्हे मागे घेतले जातील: एकनाथ शिंदे

मच्छिमारांची सुटका केल्यानंतर त्यांना भारतीय तटरक्षक दलाकडून सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. त्यांना खाद्यपदार्थ आणि प्रथमोपचार करण्यात आले. सुटका झालेल्या सर्व मच्छिमारांची प्रकृती चांगली असल्याची माहिती तटरक्षक दलाने दिली आहे. 

...म्हणून 'पानिपत' चित्रपट प्रत्येकाने बघाच : राज ठाकरे