पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भारतीय जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचे ३ सैनिक ठार

भारतीय जवान

जम्मू-काश्मीरच्या सीमा भागात पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. यामध्ये पाकिस्तानचे ३ सैनिक ठार झाले तर दोन सैनिक जखमी झाले आहेत. भारतीय सैन्य दलाच्या सुत्रांनी गुरुवारी ही माहिती दिली. 

PM मोदी आता व्हिडीओच्या माध्यमातून संदेश देणार!

पाकिस्तानने बुधवारी (१ एप्रिल) आणि गुरुवारी (२ एप्रिल) जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळ शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानी सैनिकांनी भारताच्या दिशेने जोरदार गोळीबार केला. ज्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. भारतीय जवानांनी केलेल्या कारवाईत पाकिस्तानचे ३ सैनिक ठार झाले आहेत तर दोन सैनिक जखमी झाले आहेत. 

तबलिगी जमातवरुन ए आर रहमान म्हणाला...

दरम्यान, ३१ मार्च रोजी पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी सैनिकांनी भारताच्या दिशेने जोरदार गोळीबार केला होता. सुरक्षा प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'पाकिस्तानी सैनिकांनी मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास बालाकोटा सेक्टरमध्ये जोरदार गोळीबार केला. पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले होते.'

९६० तबलीगी परदेशी नागरिक काळ्या यादीत, पर्यटन व्हिसाही केला रद्द!