पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भारतीय जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचे ४ सैनिक ठार

जम्मू-काश्मीर जवान

जम्मू-काश्मीरच्या सीमा भागात पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरु आहे. भारतीय जवानांनी पाकिस्ताकडून होणाऱ्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले आहे. यामध्ये पाकिस्तानचे ३ ते ४ सैनिक ठार झाले आहेत. गुरुवारी रात्री पुंछ- राजौरी सेक्टरमधील सीमा भागांमध्ये पाकिस्तानी सैन्यांनी भारताच्या दिशेने जोरदार गोळीबार आणि बॉम्ब हल्ला केला. भारतीय जवानांनी या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानी सैन्यांच्या चौक्यांना लक्ष्य केले.

 

CAA: भाजपच्या मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचे तीन ते चार सैनिक ठार झाले आहेत. तसंच पाकिस्तानी सैन्यांच्या चौक्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याआधी बुधवारी पाकिस्तानी सैन्यांनी केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनामध्ये भारताचा एक जवान शहीद झाला होता. या गोळीबाराला भारतीय जवानांनी प्रत्युत्तर दिले होते त्यात पाकिस्तानचे तीन सैन्य ठार झाले होते.  

एनआरसी आणि एनपीआर म्हणजे गरिबांवरील टॅक्स, राहुल गांधींचा आरोप

बुधवारी रामपूर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते. ज्यामध्ये वीराश कुरहाठी हे जवान शहीद झाले होते. तर एका स्थानिक महिलेचा मृत्यू झाला होता. तसंच, पाकिस्तानी सैन्यांनी बारामुल्ला जिल्ह्यातील अनेक सेक्टरमध्ये जवानांच्या चौक्या आणि नागरीवस्त्यांना लक्ष्य केले होते. पाकिस्तांकडून सतत होणाऱ्या गोळीबारामुळे सीमा भागातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. 

CAA विरोधात दिल्लीतील जामा मशीद परिसरात पुन्हा आंदोलन

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:indian army retaliated effectively to inflict damage on pakistan posts 3 to 4 pakistan soldiers killed